शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘सीईओं’च्या दालनासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:56 IST

घोषणा देत जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शिवसेना- काँग्रेस आघाडीच्या सदस्यांनी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मारला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांना तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, दलित, बहुजनांची अडवणूक करणाºया प्रशासनाचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय, अशा गगनभेदी घोषणा देत जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शिवसेना- काँग्रेस आघाडीच्या सदस्यांनी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मारला. तथापि, या घटनेने आपण व्यथित झालो आहोत. ही घटना आपल्या जिल्ह्यासाठी आनंददायी नाही, अशा शेलक्या शब्दात मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांनी सदस्यांच्या आंदोलनाची निर्भत्सना केली.मावळत्या जि. प. सदस्य मंडळाच्या कार्यकाळात १६ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या समाजकल्याण विषय समितीने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत २३७ प्रस्तावांना मान्यता दिली. तेव्हापासून या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत चालढकल केली जात आहे.२३ आॅगस्ट रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी या विषयावर प्रशासनाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि दलित वस्ती सुधार योजनेच्या संचिकेविषयी माहिती करून घेतली. तेव्हा येत्या दोन दिवसांत या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी सभेत दिले, असे सदस्यांचे म्हणणे आहे.तथापि, २३ आॅगस्टनंतर दहा दिवसांचा कालावधी लोटला तरी प्रशासनाने ‘त्या’ संचिकेबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे संतप्त बांधकाम सभापती विलास भुमरे, समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल, शिक्षण सभापती मीनाताई शेळके, महिला व बालकल्याण सभापती लोहकरे आदींच्या नेतृत्वाखाली सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सेना- काँग्रेस सदस्यांनी आर्दड यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला व घोषणाबाजी सुरू केली. काही अवधीतच पोलिसांचा मोठा ताफा तिथे पोहोचला.त्यानंतर कृष्णा पाटील डोणगावकर, विलास भुमरे, रमेश गायकवाड, किशोर बलांडे आदींच्या शिष्टमंडळाने दालनात जाऊन आर्दड यांची भेट घेतली व सदस्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी त्यांना सोबत बाहेर आणले. गुरुवारपर्यंत ही प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिल्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्या सदस्यांना ताब्यात घेऊन क्रांतीचौक ठाण्यात नेले.