शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
3
Viral Video : वीटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
4
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
5
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
6
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
7
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
8
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
9
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
10
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
11
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
12
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
13
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
14
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
15
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
16
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
17
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
18
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
19
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
20
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल

घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी रेफर करणाऱ्या केंद्रांचे होणार बळकटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 17:32 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी रुग्णालय, आरोग्य केंद्रांतून रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे.

ठळक मुद्देवर्षाला १८ हजार प्रसूती होणाऱ्या घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे कौतुक नुकत्याच मुंबईत झालेल्या देशभरातील २३ वैद्यकीय संचालकांच्या बैठकीत झाले.

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी रुग्णालय, आरोग्य केंद्रांतून रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रुग्णसेवेचा भार वाढतो. त्यामुळे नेमक्या कोणत्या ठिकाणांहून सर्वाधिक रेफर होते, अशी केंद्रे शोधून त्यांचे बळकटीकरण केले पाहिजे. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे बनवून उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे उपायुक्त डॉ. दिनेश बसवाल यांनी दिली.

वर्षाला १८ हजार प्रसूती होणाऱ्या घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे कौतुक नुकत्याच मुंबईत झालेल्या देशभरातील २३ वैद्यकीय संचालकांच्या बैठकीत झाले. या विभागाने निर्माण केलेली आदरपूर्वक प्रसूती सेवा पद्धती आता ‘लक्ष्य’ उपक्रमाच्या माध्यमातून देशभरात लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. दिनेश बसवाल यांच्यासह आरोग्य व कुटुंब कल्याण सहायक संचालक डॉ. अनिरुद्ध देशपांडे, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे सल्लागार डॉ. अरुण सिंग, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सल्लागार डॉ. सलिमा भाटिया, युनिसेफचे डॉ. भुयान यांच्या पथकाने बुधवारी (दि.३०) प्रसूतीशास्त्र विभागाची पाहणी केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर,  वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांची उपस्थिती होती. यावेळी पथकाने प्रसूती कक्ष, वॉर्डांमधील स्थितीची पाहणी केली.  या सगळ्या परिस्थितीतही  हा विभाग सन्मानजनक मातृत्वासाठी चांगले काम करीत असल्याची प्रशंसा डॉ. बसवाल यांनी केली. 

‘लक्ष्य’मध्ये वैद्यकीय महाविद्यालयप्रसूतिगृह सक्षम करून मातामृत्यू, बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘लक्ष्य’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश करून येथील सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी नॅशनल हेल्थ मिशन (एनएचएम) मधून निधीची तरतूद करण्यात येणार आहे .डॉ. गडप्पा यांनी तयार केलेल्या ‘एसओपी’चा अभ्यास करून त्याला देशभरात लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती डॉ. बसवाल यांनी दिली. राज्य शासनाची शिफारस मिळाल्यास घाटी रुग्णालयात प्रशिक्षण केंद्र देण्याचे संकेतही त्यांनी दिले. 

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीmedicineऔषधंWomenमहिलाdoctorडॉक्टर