राम मगदूम - गडहिंग्लज-गडहिंग्लजचा वाढता विस्तार आणि शहातील वाढती वाहतूक लक्षात घेता नागरी सुरक्षिततेसाठी शहरातील चार प्रमुख मार्गांवर भुयारी वीजवाहिन्या घालण्याची गरज आहे. त्याकरिता अनुदान मिळविण्यासाठी नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाने शासनाकडे पाठपुराव्याची आवश्यकता आहे.करवीर संस्थान काळात स्थापन झालेल्या गडहिंग्लजनगरीची लोकसंख्या सुमारे ३० हजारांच्या घरात आहे. त्याशिवाय शहरालगतच्या बड्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत वसलेल्या वसाहतींमध्ये सुमारे २० हजाराच्या आसपास लोकवस्ती आहे. भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत शहरातील लोकवस्ती अधिक दाट आहे. सार्वजनिक आणि नागरी सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे. भुयारी वीजवाहिनी ही त्यापैकीच शहराची एक मूलभूत गरज आहे.गडहिंग्लजच्या आजूबाजूच्या खेड्यात प्रामुख्याने उसाचे उत्पादन अधिक आहे. त्याचप्रमाणे गडहिंग्लज साखर कारखान्यासह परिसरातील आजरा, चंदगड, भुदरगड व कागल आणि सीमाभागातील साखर कारखान्यांनादेखील येथील ऊस मोठ्या प्रमाणात जातो. त्यामुळे उसाची वाहतूकदेखील शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या प्रमुख मार्गावरूनच होते. शहरातील संकेश्वर रोड, आजरा रोड, चंदगड रोड व गारगोटी रोड या मार्गावरील रस्त्यांच्या दोन्ही बाजूचे धोकादायक विद्युत खांब आणि वीजवाहिन्यांचा ऊस वाहतुकीच्या गाड्या आणि अवजड वाहनांना अडथळा होत आहे. त्यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत. सुरक्षित वाहतुकीसाठी शहरातील प्रमुख मार्गावरील रस्त्याच्या दोनही बाजूचे धोकादायक खांब सुरक्षित ठिकाणी अन्यत्र हलविण्याची गरज आहे. त्यासाठी ‘भुयारी वीजवाहिन्या’ हाच एकमेव पर्याय आहे.आजरा रोडवरील गिजवणे ओढा ते संकेश्वर रोडवरील शेरी ओढ्यापर्यंत आणि छ. शिवाजी पुतळा ते भडगाव रोड जकात नाका आणि मुसळे कॉर्नर ते कडगाव रोडवरील ओढ्यापर्यंत भुयारी वीजवाहिन्यांची गरज आहे. त्यामुळे या चारही मार्गावर दोनपदरी वाहतूक सुरू होऊन शहरातील वाहतुकीची कोंडीची मोठी समस्या दूर होण्यासाठीही मदत होणार आहे.दोन पदरी रस्ता अन् दुभाजकासाठीगडहिंग्लज शहरातील संकेश्वर रोड, आजरा रोड, कडगाव रोड व भडगाव रोड या प्रमुख रस्त्यांची रूंदी १८ ते २५ फुटापर्यंत आहे. भुयारी वीजवाहिनी योजना राबविल्यास या मुख्य रस्त्यांवरील पथदिवे या रस्त्यांच्या मधोमध बसून पुरेसा प्रकाश मिळण्याबरोबरच आपोआप रस्ता दुभाजक तयार होऊन शहरात दोन पदरी रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होईल.शासकीय अनुदानाची गरज‘गडहिंग्लज’ ही ‘क’ वर्ग नगरपालिका आहे. घरफाळा व पाणीपट्टीशिवाय उत्पन्नाचे अन्य स्त्रोत नसल्यामुळे पालिकेच्या उत्पन्नाला मर्यादा आहेत. त्यामुळे भुयारी वीजवाहिनी योजना स्वत:च्या निधीतून राबविणे केवळ अशक्य आहे. त्यासाठी सामाजिक सुरक्षितता, नागरी हित आणि शहराची मूलभूत गरज विचारात घेऊन शासनाच्या ऊर्जा खात्याने याकामी पालिकेस पुरेसा निधी अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
बेमुदत रिक्षा बंदची हाक
By admin | Updated: May 26, 2015 00:50 IST