शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा रास्ता रोको

By admin | Updated: August 15, 2014 00:04 IST

हिंगोली: शहरासह जिल्ह्यात सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

हिंगोली: शहरासह जिल्ह्यात सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सर्वत्र शांततेत हे आंदोलन झाले असले तरी वसमतमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.बायपासवर वाहतूक खोळंबाहिंगोली/सेनगाव : धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली शहरातील अकोला बायपास रस्त्यावर गुरूवारी दुपारी २ वाजता धनगर अर्धातास रास्तारोको आंदोलन केले. सेनगाव येथेही आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.हिंगोलीतील आंदोलनात पं.स.चे उपसभापती विनोद नाईक, माजी सभापती लक्ष्मणराव वायकोळे, जि.प. सदस्य शिवाजीराव मस्के, शिवाजी ढाले, पंढरीनाथ ढाले, अ‍ॅड. गडदे, गजानन डाळ, पोले, हराळ, चिलगर, घुमनर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेनगावातही आंदोलनसेनगाव येथे धनगर समाजाच्या वतीने रास्तारोको केल्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. तहसीलदारांना निवेदन देताना गंगाराव फटांगळे, रवींद्र गडदे, विकास शिंदे, दीपक फटांगळे, दिलीप होडबे, सुनील शिंदे, बाजीराव गडदे, दिलीप कुंदर्गे, सर्जेराव पोले, गणेशराव हराळ, अशोक ठेंगल, शालिकराम गडदे, देवीदास कुंदर्गे, बाबाराव शिंदे, दिलीप कुंदर्गे, छत्रपती गडदे यांच्यासह समाजबांधव हजर होते. औंढ्यातही प्रतिसादऔंढा नागनाथ : येथील जिंतूर टी पाँईटवर धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. निवेदन तहसीलदार श्याम मदनूरकर यांना देण्यात आले.सकाळी ११ वाजता ४५ मिनिटे चाललेल्या या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मान्यवर नेत्यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवेदनात भारतीय राज्यघटनेच्या ४६ व्या कलमानुसार क्र. ३६ वर धनगड ही जात समाविष्ट आहे. पण ‘ड’ आणि ‘र’ चा फरक करून महाराष्ट्रातील धनगर समाजास एसटीच्या सवलतीपासून वंचित ठेवले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. डॉ. विलास खरात, बाबूराव पोले, प्रा. साहेबराव देवकते, सर्जेराव दिंडे, हरिष पोले, जगन मस्के, प्रकाशराव पोले, भास्कर पोले, शरद पोले, नंदकुमार देवकते, हनुमान देवकते, बडगीर, विठ्ठल मुदनर, शिवाजी नाईक, संजय नरोटे, साहेबराव कर्रे, संजय पोले, शेषराव थोरात, नितीन पोले, दिनकर कर्रे, रामराव पोले, सचिन पोले, ज्ञानेश्वर पोले, पंडितराव पोले, गजानन पोले, मनोज खताळ, शंकर आळसे, शंकरराव नाईक, बंडु पोले, दत्ता पोले, हरिहर पोले, साहेबराव सातपुते, वसंतराव पोले, दिलीप पोले आदींसह तालुक्यातील अनेक गावांतील नागरिक होते. ाुरीत ठिय्याकळमनुरी : धनगर समाजाला एसटी आरक्षण प्रवर्गात टाकून त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने १४ आॅगस्ट रोजी हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालयासमोर पाऊण तास रास्तारोको करण्यात आला.मागणीचे निवेदन तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते यांना देण्यात आले. रास्तारोकोमुळे हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. निवेदनावर अनंतकुमार पाटील, केशव मस्के, बाबूराव पाटील पुयनेकर, कांतराव शिंदे, अ‍ॅड. रवी शिंदे, बाबा नाईक, शिवाजी शिंदे, बाळासाहेब वायकोळे, खंडबाराव नाईक, अशोक करे, अशोक दिंडे, अमृतराव होडबे, तुकाराम भुतनर, साहेबराव करे, केशव नाईक, विजय कोकरे, तुकाराम कवाने, दिनकर कोकरे, तुकाराम ढोणे, बालाजी लोंढे, विजय कोकरे, मारोतराव खांडेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.