शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

६ तास रास्ता रोको

By admin | Updated: September 12, 2014 00:05 IST

मुखेड : शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांच्या हत्येची सीबीआय अथवा सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी ११ सप्टेंबर रोजी मुखेड राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़

मुखेड : शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर पाटील ठाणेकर यांच्या हत्येची सीबीआय अथवा सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी ११ सप्टेंबर रोजी मुखेड राज्य रस्त्यावर भाजप-सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़शंकर पाटील ठाणेकर यांची अज्ञात दरोडेखोरांनी हत्या केल्याची घटना जामखेड - अहमदनगर राज्य रस्त्यावर ३ सप्टेंबरच्या रात्री घडली होती़ आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना अद्यापही यश आले नाही़ घटनेला आठ दिवस उलटल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत़ या प्रकरणाचे सत्य लवकरात लवकर बाहेर यावे यासाठी सीआयडी अथवा सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मुखेड तालुक्यातील भाजप-सेना कार्यकर्त्यांसह विविध संघटनांनी गुरुवारी सहा तास रास्ता रोको अांदोलन केले़ भाजपचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख धोंडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी माजी आ़ सुभाष साबणे, माजी जि़ प़ सभापती गोविंदराव राठोड, नागनाथ जळकोटे, डॉ. मनोजराज भंडारी, वसंतराव संबुटवाड, डॉ़ तुषार राठोड, नगराध्यक्षा कालिंदी गेडेवाड, उपनगराध्यक्षा शहाजहां बेगम पठाण, माधव साठे, नामदेव पाटील जाहूरकर, डॉ़माधव पाटील उच्चेकर, डॉ़ वीरभद्र हिमगिरे, व्यंकट पाटील चांडोळकर, शंकर पोतदार, जगन्नाथ कामजे, अशोक गजलवाड, माधव मुद्देवाड, रावसाब रॅपनवाड, विश्वनाथ कोलमकर, अनिल जाजू, राजू लाडके, नाजीम पाशा, डॉ़ अतुल देबडवार, नगरसेवक संजय बेळीकर, जगदीश बियाणी, विश्वनाथ लोखंडे, हणमंत नरोटे, शिवाजी कार्लेकर, शिवाजी चव्हाण, उदय पाटील पाळेकर, देवीदास सुडके यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते़ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़ मागणीचे निवेदन तहसीलदार एस़ पी़ घोळवे, पोलिस उपविभागीय अधिकारी वीरकर यांना निवेदन देण्यात आले़ठाणेकर यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठी अ‍ॅडग़ोविंद डुमणे हे ९ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले होते़ ठाणेकर यांच्या हल्लेखोरांचा शोध लावण्यात पोलिस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लवकरच याचा उलगडा लागेल असे आश्वासन अ‍ॅड़डुमणे यांना उपविभागीय पोलिस अधिकारी वीरकर, तहसीलदार घोळवे यांनी उपोषणकर्त्यांना दिल्याने डुमणे यांनी उपोषण मागे घेतले़ (वार्ताहर)कोणत्याही चौकशीस तयार- सुभाष साबणेनिवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही राजकीय विरोधक माझा या घटनेशी संबंध जोडून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, यासाठी मी स्वत: नार्को, लाय डिटेक्टर, ब्रेन मॅपींग तपासणीसह इतर कोणत्याही चौकशीस तयार आहे, असे प्रतिपादन माजी आ. सुभाष साबणे यांनी केले. मागील ३० वर्षांपासून ठाणेकर माझे मित्र होते. माझ्या कुंटुबातील अविभाज्य सदस्य होते. ठाणेकर यांच्या हत्येचा काही जण भांडवल करीत आहेत. स्थानिक दैनिकातून बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. स्व. ठाणेकर यांनी मागील काळात राजकीय नेत्यांनी केलेला गैरव्यवहार उघडकीस आणला होता, तेंव्हापासून त्यांना धमक्या येत होत्या.तक्रारही त्यांनी पोलिसांकडे केली होती, असेही साबणे यांनी सांगितले.