शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकावर ताटकळत बसणे थांबणार, प्रत्येक बसचे कळणार ‘लाइव्ह लोकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील ५५० बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ (व्हीटीएस) ही जीपीएस प्रणालीवर आधारीत यंत्रणा ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील ५५० बसमध्ये ‘व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टिम’ (व्हीटीएस) ही जीपीएस प्रणालीवर आधारीत यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक बसस्थानकात स्क्रिन बसविण्यात आले आहे. त्याद्वारे प्रवाशांना प्रत्येक बसचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. त्यामुळे यापुढे कित्येक तास बसस्थानकात ताटकळत बसणे थांबणार आहे.

राज्यातील सर्व बसगाड्यांना जीपीएस म्हणजे ट्रॅकिंग यंत्रणा बसविण्यात येत आहे. याद्वारे एसटी महामंडळाच्या सर्व बस जीपीएस प्रणाली आणि मोबाइल ॲपच्या माध्यमातून १०० टक्के ऑनलाइन होतील, असा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. सोलापूर विभागात ही सिस्टिम सुरू झाली आहे. औरंगाबाद विभागात आतापर्यंत ५५० बसला जीपीएस बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या कार्यालयात संगणकाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना बसचे लोकेशन दिसत आहे. लवकरच या यंत्रणेचे उद्घाटन करून ही सुविधा बसस्थानकात प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मोबाइल ॲपचेही काम सुरू आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात मोबाइल ॲपद्वारे घरबसल्या प्रवाशांना बसचे लोकेशन पाहता येईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

-----

लवकरच प्रारंभ

औरंगाबाद विभागातील सर्व बसला व्हीटीएस यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. बसस्थानकांमध्ये स्क्रिनदेखील लावण्याचे काम करण्यात आलेले आहे. लवकरच या स्क्रिनवर बसगाड्यांचे लाेकेशन दिसण्यास सुरुवात होईल.

-अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

----

बसस्थानकात लागले मोठे स्क्रिन

- शहरातील दोन्ही बसस्थानकांसह ग्रामीण भागांतील बसस्थानकांत स्क्रिन बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

- या स्क्रिनला इंटरनेटचे कनेक्शन देण्याचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण होताच स्क्रिनवर बसचे लोकेशन दिसण्यास सुरुवात होईल.

- एखादी बस कुठपर्यंत आली आहे, हे प्रवाशांना या स्क्रिनद्वारे कळू शकणार आहे. चौकशी कक्षात जाऊन बस कधी येईल, हे विचारण्याची वेळ येणार नाही.

----

चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप

- विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, आगार व्यवस्थापक यांना या यंत्रणेद्वारे बसची स्थिती कळण्यास मदत होणार आहे.

- एखाद्या ठिकाणी नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळ बस थांबली, चालक-वाहकांनी कोठे टाइमपास केला तर ते लक्षात येईल.

- अशा परिस्थितीत वेळीच चालकाला, वाहकाला समज दिली जाईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होईल. बसगाड्यांची वेळ पाळणे या यंत्रणेमुळे सोपे होणार आहे.

---

लोकेशनसह बसची गतीही कळणार

- औरंगाबाद विभागातून धावणाऱ्या प्रत्येक बसच्या मार्गाचे मॅपिंग करण्यात आले आहे. यात बसच्या प्रत्येक थांब्यांची नोंद घेण्यात आली आहे.

-व्हीटीएस प्रणालीमुळे बसच्या लोकेशनसह वेगही कळण्यास मदत होणार आहे. ‘एसटी’ला ६५ कि.मी. प्रतितास इतक्या वेगाची मर्यादा आहे.

- वेग मर्यादेपेक्षा बसची अधिक गती झाल्यास अलर्ट मेसेज येतो. त्याद्वारे वेगावर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात चालकाला सूचना, प्रसंगी कारवाईही केली जाईल.