शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बंजारा समाजाचा तालखेड फाट्यावर रास्ता रोको

By admin | Updated: August 7, 2014 23:33 IST

तालखेडफाटा येथे बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.

माजलगाव: गेल्या अनेक महिन्यांपासून बंजारा समाजाच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याच्या निषेधार्थ माजलगाव तालुक्यातील तालखेडफाटा येथे बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. यामुळे बऱ्याच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.बंजारा समाजाच्या मागण्यांकडे महाराष्ट्र शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करावा, ही मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र यावर शासनाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. यामुळे बंजारा समाजावर एक प्रकारे अन्याय होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केल्यास त्यांची आर्थिक प्रगती तर होईलच शिवाय ते समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील. अनेक भागामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश केल्यास त्यांना नोकरीसारखे सक्षम साधन मिळेल. त्यामुळे एसटी प्रवर्गात बंजारा समाजाचा समावेश करणे काळाची गरज बनली असल्याचे मत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले आहे.तांडा सुधार योजनेसाठी पैसे द्यावेतअनेक ठिकाणी बंजारा समाजाचे तांडे आहेत. तेथे राहणाऱ्या लोकांना दैनंदिन जीवनात विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अनेक तांड्यावर रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अशा परिस्थितीत बंजारा समाजाचे नागरिक रहात आहेत. त्यामुळे तांडा सुधार योजनेसाठी दरवर्षी पाचशे कोटींचा निधी दिला पाहिजे तरच तांड्यांची सुधारणा होईल. त्या ठिकाणी नळ, रस्ते यासह अनेक सुविधा पोहचतील. तांडा, वाड्यांना ग्रामपंचायतचा दर्जा द्यावातांडा, वाड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजाच्या लोकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तांडा वस्ती सुधार योजनेसाठी निधी तर द्यावाच यासह तांडा व वाड्यांना ग्रामपंचायतचा दर्जा द्यावा, त्यामुळे तेथे विविध योजना राबविल्या जातील. बेरोजगार लोकांच्या हाताला काम मिळेल. त्यामुळे तांडा, वाड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा देणे आवश्यक आहे. असे झाले तरच त्यांचे दैनंदिन प्रश्न मार्गी लागतील.या मागण्यांसह विद्यार्थ्यांसाठीची नॉन क्रिमिलियरची अट रद्द करावी आदी मागण्या मांडण्यात आल्या. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. तालखेडफाट्यावर रास्ता रोको केल्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. दिगांबर राठोड यांनी केले. आंदोलनात तुकाराम चव्हाण, नवनाथ पवार, श्रीराम राठोड, विलास पवार, अजय चव्हाण, सुभाष पवार, माणिक पवार, गगन जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)