हिंगोली : गोर बंजारा समाजाच्या वतीने आरक्षण व अन्य मागण्यांसाठी खटकाळी बायपास येथे २२ आॅगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन झाले.या समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे निकष लागू करावेत, ही प्रमुख मागणी आहे. तसेच गोर बोलीला भाषेचा दर्जा, समाजाच्या उन्नतीसाठी विविध योजना व सुविधांचीही मागणी केली आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, मोर्चा अशी आंदोलने झाली. मात्र शासनाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने आज हे आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यात महिला व पुरूष मोठ्या संख्येने सहभागी होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळू राठोड, शेषराव चव्हाण, के.डी.राठोड, नारायणबाबा राठोड, विठ्ठल पवार, बन्सी राठोड, येमजी राठोड, लखूसिंग राठोड, रमेश जाधव, शंकर आडे, अॅड.पंजाब चव्हाण, अॅड.संतोष राठोड, गोवर्धन राठोड, अनिल नाईक, अशोक चव्हाण, यू.टी.जाधव, नामदेव चेअरमन, श्याम जाधव, भगवान जाधव, बन्सी जाधव, नामदेव राठोड, बाळू राठोड, रवी जाधव, एस.पी.राठोड, संदीप राठोड, रितेश पवार, श्रावण चव्हाण आदी उपस्थित होते.
बंजारा समाजाचा रास्ता रोको
By admin | Updated: August 23, 2014 00:47 IST