मंठा : देवगाव खवणे येथे रोहयोतंर्गत तळ्यातील गाळ उपसा करण्याचे काम बंद केल्याचा निषेधार्थ ३०० मजुरांनी मंठा -लोणार रस्त्यावर देवगाव खवणे पाटीवर भर उन्हात सोमवारी रास्तारोक ो आंदोलन केले. दोन तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. विशेष म्हणजे पोलिस व तहसील प्रशासनाचे कोणतेच अधिक ारी-क र्मचारी फि रक ले नाहीत.देवगाव खवणे येथील रोजगार हमी योजनेतंर्गत तळ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू होते. या कामावर ३०० मजूर कामावर होते. मात्र, हे क ाम २३ मार्चपासून बंद के ले. काम बंद असल्याने ३०० महिला- पुरूष मजूर बेरोजगार झाले होते. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कामे सुरु करण्यासाठी कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करून काम पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य लालबाबटा शेतमजूर युनियनचे सुरेश खवणे यांच्यासह ३०० मजूर या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनापूर्वी मंठ्याचे तहसीलदार व परतूरचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले होते. मात्र, कोणतीच क ारवाई झाली नाही. कामही सुरु करण्यात आले नाही. अखेर सोमवारी सकाळी ११:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत महिला मजुरांनी टोपले, टिकास व खोरे घेऊन रास्तारोको आंदोलन केले.यावेळी पाच बस, एक लग्नाचे वऱ्हाड, खाजगी असंख्य वाहने तब्बल तीन तास खोळंबली होती. तहसीलदार एल.डी. सोनवणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच पोलिस निरीक्षक यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)
भरउन्हात मजुरांचा रास्ता रोक ो
By admin | Updated: April 19, 2016 01:10 IST