शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

हत्येनंतर मृतदेहात भरले दगडगोटे; गुन्ह्यात कुख्यात बबलासह ४ आरोपी दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 19:14 IST

तरुणाच्या निर्घृण हत्येच्या गुन्ह्यात कुख्यात बबलासह ४ आरोपी दोषी

ठळक मुद्देहिलाल कॉलनीतून तरुणाचे अपहरण व  हत्याकुख्यात बबलासह ४ आरोपी दोषी

औरंगाबाद : भूखंडाच्या वादातून प्लंबरचा निर्घृण खून करून मृतदेहात दगड गोटे भरून मृतदेह दौलताबाद शिवारातील विहिरीत फेकल्याप्रकरणी आरोपी बबला ऊर्फ शेख वाजेद  शेख असद, त्याचा भाऊ शेख अमजद शेख असद ऊर्फ मोहसीन, शेख कलीम ऊर्फ कल्लू शेख सलीम आणि सय्यद शहाबुद्दीन ऊर्फ  शहाब सय्यद राशेद यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. भोसले यांनी बुधवारी दोषी ठरविले. यात गुन्हेगाराला न्यायालयाकडून काय शिक्षा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेख जब्बार शेख गफ्फार (३०, रा. हिलालनगर) असे  खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  याविषयी अधिक माहिती अशी की,   बिस्मिल्ला कॉलनीतील भूखंडाच्या मालकीहक्कावरून आरोपींचा जब्बारसोबत वाद झाला होता. हा भूखंड आपल्याला द्यावा. तुला दुसऱ्या ठिकाणी चांगला भूखंड देतो, असे आरोपी त्याला म्हणत. जब्बार मात्र तो भूखंड सोडायला तयार नव्हता. यातून  बबला ऊर्फ शेख वाजेद, त्याचा भाऊ अमजद , शेख कलीम ऊर्फ कल्लू आणि सय्यद शहाबुद्दीन यांनी १६ मे २०१८ रोजीच्या रात्री रिक्षातून जब्बारचे अपहरण केले. यानंतर त्याला बेगमपुरा स्मशानभूमीजवळ त्यांनी जिवे मारून टाकले. यानंतर जब्बारचा मृतदेह घेऊन दौलताबाद परिसरातील मोमबत्ता तलावाजवळ घेऊन गेले. तेथे आरोपींनी जब्बारच्या पोटातील आतडे काढून दगडगोटे भरले. यानंतर मृतदेह बांधून विहिरीत टाकला. २० मे २०१८ रोजी विहिरीत मृतदेह आढळला होता. 

जब्बारचे अपहरण करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सांगितले होते. मृताचा भाऊ शेख सत्तार यांनी याविषयी बेगमपुरा ठाण्यात संशयितांविरुद्ध अपहरण आणि खुनाची तक्रार नोंदविली होती. याविषयी खुनाचा गुन्हा नोंदवून सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे आणि कर्मचाऱ्यांनी तपास करून सात संशयित आरोपींना अटक केली. आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सतीश मुंदवाडकर यांनी २१ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. वर्षा घाणेकर-वाघचौरे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपी शेख वाजेद ऊर्फ  बबला,  शेख अमजद ऊर्फ मोहसीन, शेख कलीम ऊर्फ  कल्लू आणि सय्यद शहाबुद्दीन ऊर्फ शहाब  यांना भारतीय दंडसंहितेच्या ३६४, ३६५, ३०२, २०१, ३४ कलमान्वये दोषी ठरविले. तर आरोपी  प्रकरण निकालासाठी राखीव ठेवले आहे.माफीचा साक्षीदार इम्रानने कथन केली हत्येची घटना

या खटल्यातील माफीचा साक्षीदार शेख इम्रान ऊर्फ  बाबा लोली शेख करीम याच्या डोळ्यासमोर संपूर्ण गुन्हा घडला होता. बबल्याने जब्बारवर कोयत्याने गंभीर वार केले आणि शेवटी फावड्याने मारून जब्बारला संपविले होते. त्यावेळी जब्बार हा मासळीसारखा तडफडत होता, अशी साक्ष इम्रानने न्यायालयात दिली होती. घटनास्थळालगत तबेला चालविणाऱ्या महिलेने जब्बारला सोडून देण्याची विनंती बबल्याकडे केली. मात्र त्याने तिला शिवीगाळ करून हाकलून दिले होते. दोन्हींची साक्ष प्रकरणात महत्त्वाची ठरली. माफीचा साक्षीदार शेख इम्रानला दोषी ठरविले जाणार की नाही, हे अंतिम निकालात स्पष्ट होईल.