शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर कारभारी विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:00 IST

निकाल जसजसा बाहेर येत होता तसतसा निकाल ऐकण्यासाठी बाहेर बसलेल्या पदाधिकारी -कार्यकर्त्यांमधे उत्साह संचारत होता गावागावात विजयी मिरवणूक काढण्यात आल्या.

संजय जाधव पैठणथेट जनतेतून सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत मतमोजणीनुसार सर्वाधिक सरपंचाच्या जागा जिंकत शिवसेनेने बाजी मारली आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी बिडकीन या अतिशय महत्त्वाच्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकविला असून आडूळ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. नांदर ग्रामपंचायतीवरील वर्चस्व कायम राखत काँग्रेसने परत एकदा एकहाती विजय साकारला आहे.तहसील कार्यालयात निकाल जाहीर होताच समर्थकांनी फटाके वाजवून गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा केला. विविध ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्य संत एकनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेत आपआपल्या गावाकडे रवाना झाले. गावागावात विजयी मिरवणूक काढण्यात आल्या.मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब जाधव, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निकाल ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी तहसील परिसरात गर्दी केली होती. यामुळे तहसील परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. जयजयकार व घोषणाबाजी होत असल्याने परिसरात जल्लोशपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.१३ जागेवर शिवसेनेने दावा केला असून एक जागा भाजप, एक काँग्रेस व ७ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. मतदारांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या बाजूने तालुक्यात कौल दिला असून जि.प. व पंचायत समिती निवडणुकीनंतर शिवसेनेचा हा मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया आमदार संदीपान भुमरे यांनी दिली.श्यामकुमार पुरे  सिल्लोडसिल्लोड तालुक्यातील १८ ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाले. १८ पैकी १० ग्रामपंचायतींवर भाजपचे तर ८ काँग्रेसचे निवडून आले, मात्र भाजपने १२ तर काँग्रेसने ९ जागांवर दावा केला आहे. तर सारोळा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दावा केला आहे. यामुळे खर कुणाच्या ाताब्यात किती सरपंच आहे, हे आज सांगणे अवघड आहे. आता सिल्लोडमध्ये वर्चस्व दाखवण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.सिल्लोड तालुक्यातील खुल्लोड, मोढा बुद्रुक, सावखेडा, चारनेर -चारनेर वाडी, बोरगाव बाजार, जळकी बाजार, जांभई, रेलगाव, सारोळा या नऊ ग्रामपंचायींतवर काँग्रेसचे सरपंच निवडून आल्याचा दावा नगराध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल यांनी केला आहे.तालुक्यातील रेलगाव, जांभई, सारोळा या तीन ग्रामपंचायतींवर काँग्रेस व भाजप या दोघांनी आमच्या ताब्यात ग्रा.पं. आल्याचा दावा केला आहे. काँग्रेस व भाजपच्या पॅनलकडून निवडून आलेले काही सरपंच तंबू बदलत असल्याने कोन कुणाचे हे आज तरी सांगणे कठीण झाले आहे. काही सरपंचांनी तर काँग्रेस व भाजप दोघांचे स्वागत स्वीकारले आहे. आता सिल्लोडमध्ये वर्चस्व दाखवण्याची स्पर्धा सुरु झाली आहे.भवन सर्कलमधील तीन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात ठेवण्यास मोठे- मुलतानी या जोडीला यश आले आहे.भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे यांच्या बोरगाव कासारीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती, यात मोठे यांच्या नेतृत्वाखालील पूर्णेश्वर ग्रामविकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलतानी, पं. स. सभापती ज्ञानेश्वर तायडे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस कमलेश कटारिया यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले तर काँग्रेस विजयी उमेदवारांचे नगराध्यक्ष अब्दुल समीर, उपसभापती नंदकिशोर सहारे, सतीश ताठे व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या बोरगाव कासारी ग्रामपंचायतींवर भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी सलग तिसºयांदा भाजपचा झेंडा फडकवून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर काँग्रेस तालुकाध्यक्ष देवीदास लोखंडे यांची पिंपळदरी ग्रामपंचायत हातातून गेली. तिथे भाजपचा सरपंच व सदस्यपदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहे.लालखाँ पठाण  गंगापूरतालुक्यातील ३३ पैकी १७ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच विराजमान झाल्या आहेत. यात भोयगावच्या सरपंच ज्योती सतीश डेडवाल यांनी सर्व महिलांपेक्षा जास्तीची मते घेतली. या निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारली. काही महिन्यांपूर्वी शिवसेना तालुकाप्रमुख पदाचा पदभार स्विकारुन मागील निवडणुकीपेक्षा दुपटीने यश संपादन मिळवून भाजपला शह दिल्याने तालुक्यात सेनेचे प्राबल्य वाढले असल्याचे चित्र दिसत आहे. गंगापूर येथील शिवसेना कार्यालयात तालुका प्रमुख दिनेश मुथा, लक्ष्मण सांगळे, सुभाष कानडे, पांडुरंग कापे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयी सरपंचांचे स्वागत करण्यात आले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाहिजे तसे यश मिळवता आले नाही.निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी उमेदवारांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले. ९ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयातील सभागृहात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी या ठिकाणी ९ टेबल लावण्यात आले होते. मतमोजणी एकूण १२ फेºयात झाली. सकाळी १०.३० वाजता पहिल्या फेरीतील पेंडापूर गावाचा निकाल हाती आला. यानंतर एका पाठोपाठ निकाल येण्यास सुरुवात झाली. निकाल जसजसा बाहेर येत होता तसतसा निकाल ऐकण्यासाठी बाहेर बसलेल्या पदाधिकारी -कार्यकर्त्यांमधे उत्साह संचारत होता. निकाल ऐकण्यासाठी तहसील परिसरात एकच गर्दी उसळली होती.