शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

एएमआरडीएला नगरविकास विभागाचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा; क्षेत्रात येणार्‍या गावांच्या हद्द ठरल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 14:51 IST

एएमआरडीएला (औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) नगरविकास विभागाने विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ४० (१ घ) नुसार नियोजन प्राधिकरण म्हणून नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.

- विकास राऊत 

औरंगाबाद : एएमआरडीएला (औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) नगरविकास विभागाने विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ४० (१ घ) नुसार नियोजन प्राधिकरण म्हणून नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. वर्षभरापूर्वी एएमआरडीएला शासनाने मंजुरी दिली; परंतु नगररचना नियमानुसार विकास परवानग्यांचे अधिकार दिले नव्हते. त्यामुळे महानगर हद्दीतील बहुतांश गावांतील अकृषक परवानग्यांना ब्रेक लागला होता. नगरविकास खात्याने प्राधिकरणास मंजुरी देत त्याअंतर्गत येणार्‍या गावांची हद्द, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेकडील सीमांकनदेखील जाहीर केले आहे. 

प्रभारी महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांना याबाबत गेल्या आठवड्यात शासनाने प्राधिकरण मंजुरीबाबत कळविले आहे. औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे क्षेत्र जिल्ह्यातील औरंगाबाद मनपा, खुलताबाद नगरपालिका, छावणी परिषद क्षेत्र, औरंगाबाद, गंगापूर, पैठण, फुलंब्री, खुलताबाद तालुका (भागश:) प्राधिकरणाच्या सीमेमध्ये आला आहे. 

एएमआरडीएच्या हद्दीत आलेले क्षेत्रपूर्वेकडील हद्द : औरंगाबाद तालुक्यातील लामकाना गावाची उत्तर व पूर्व सीमा, गेवराई खुबरी, बनेगाव, जयपूर, करमाड, मंगरूळ, महंमदपूर, एकलहरा, पिंपरी बुद्रूक या गावांची पूर्व सीमा, तसेच अंबिकापूर गावाची पूर्व व दक्षिण सीमा, शहापूर गावाची दक्षिण सीमा, पिंपळगाव पांढरी गावाची पूर्व सीमा प्राधिकरणाची हद्द आहे.

पश्चिमेकडील हद्द : गंगापूर तालुक्यातील राजारा, मलकापूर, बोरगावची पश्चिम सीमा, देरडा गावची पश्चिम व उत्तर सीमा, गोविंदपूर, रांजणगाव पोळ, एक दुरडी, वाघळगावची पश्चिम सीमा, शहनवाजपूर गावाची पश्चिम व उत्तर सीमा, पोटूळ, टाकळीवाडी गावाची पश्चिम सीमा, पाचपीरवाडी गावाची दक्षिण सीमा, देवळी, खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा व वेरूळची पश्चिम सीमा आता प्राधिकरणाची हद्द असेल. 

दक्षिणेकडील हद्द: औरंगाबाद तालुक्यातील पांढरी गावाची दक्षिण सीमा, काद्राबादची दक्षिण सीमा, बेंबळवाडी, जोडवाडीची पूर्व सीमा, कचनेर तांड्याची पूर्व व दक्षिण हद्द, कचनेर गावाची दक्षिण हद्द, पैठण तालुक्यातील पारेगाव, गाजीपूर गावांची दक्षिण सीमा, नांदलगावची पूर्व व दक्षिण सीमा, कौडगाव, सोमपुरी, गिधाडा,शेकटा,रांजणी,रांजणगांव खुरी या गावांची दक्षिण सीमा, गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रूकची दक्षिण व पश्चिम सीमा, अंतापूर, चांडिकपूर, टेंभापुरी गावांची पश्चिम सीमा, रहीमपूर, सुलतानपूर गावांची दक्षिण सीमा प्राधिकरणाचा भाग असेल.

उत्तरेकडील हद्द: खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ गावाची पश्चिम व उत्तर सीमा, लामणगाव, ममनापूर गावाची उत्तर सीमा, वीरमगावची पश्चिम व उत्तर सीमा, माटरगाव, महंमदपूर, वडोद खुर्द, येसगावची उत्तर सीमा, तसेच फुलंब्री तालुक्यातील जानेफळ गावाची पश्चिम व उत्तर सीमा, वानेगाव बुद्रुक व खुर्दची पश्चिम व उत्तर सीमा, पिंपळगाव देव, म्हसाळा, फुलंब्री, दरेगाव, धामणगाव या गावांची उत्तर सीमा, वाघोळा गावची पूर्व हद्द, औरंगाबाद तालुक्यातील डोणवाडा, बोरवाडीची पूर्व सीमा, तर आडगाव सरकची उत्तर सीमा यापुढे प्राधिकरणाच्या हद्दीत  असेल. 

जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकारावर गदाजिल्हाधिकार्‍यांच्या अधिकारांवर या मंजुरीमुळे गदा आली आहे. प्राधिकरणाला कायदेशीर अधिकार दिल्यामुळे जिल्हा नगररचना विभागामार्फत देण्यात येणार्‍या एनए परवानग्यांना जिल्हाधिकारी मंजुरी देत. आता महानगर आयुक्त या परवानग्यांना मंजुरी देतील; परंतु प्राधिकरणाचे स्वतंत्र कार्यालय सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल, तोपर्यंत सहायक संचालक नगररचना आणि जिल्हाधिकार्‍यांमार्फत परवानग्या दिल्या जातील.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद