शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून राज्य सरकारला भरावा लागणार ६० लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 04:18 IST

औरंगाबाद खंडपीठ; परभणी जिल्ह्यातील प्रकरण

- डॉ. खुशालचंद बाहेतीऔरंगाबाद : २००५ मध्ये हरवलेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्यात १३ वर्षांनंतरही अपयश आल्याने औरंगाबाद खंडपीठाने शासनाला ६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.गंगाधर पाटील हे कापूस व्यापारी होते. गंगाखेडचे (परभणी) तत्कालीन आमदार विठ्ठल गायकवाड यांच्याशी त्यांचा पैशावरून वाद सुरू झाला. आपले ५३ लाखांचे देणे मिळावे, यासाठी त्यांनी गायकवाड भालकी (कर्नाटक) येथील अमृत महाराज यांना मध्यस्थी करण्यास सांगितले. त्यानुसार, २० मे २००५ रोजी देगलूर येथून अमृत महाराज व गंगाधर पाटील हे गंगाखेड येथे विठ्ठल गायकवाड यांच्या घरी आले. तेथून पाटील हे गायकवाड यांच्यासोबत जिनिंगला जाण्यासाठी निघाले. तेव्हापासून पाटील गायब आहेत.या प्रकरणात गंगाधर पाटील यांच्या पत्नीने उच्च न्यायालयात अ‍ॅड. पी.पी. मंडलिक यांच्यामार्फत हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. २००६मध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी अमृत महाराज यांना २०१४मध्ये अटक करण्यात आली. कंधारचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अहवालात गंगाधर पाटील हे विठ्ठल गायकवाड व इतरांसोबत गेल्याचे नमूद केले आहे. मात्र, पोलिसांनी अमृत महाराजांशिवाय कोणालाही ताब्यात घेतले नाही. याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.न्यायालयाने या प्रकरणात वेळोवेळी आदेश दिले. मात्र, शासन या प्रकरणात आपली जबाबदारी पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे नमूद करून शासनाने ३० दिवसांत ६० लाख रुपये न्यायालयात जमा करावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रक्कम याचिकाकर्त्यांना देण्याबाबत सविस्तर सुनावणीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारAurangabadऔरंगाबाद