शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाचा औरंगाबाद मनपाला शॉक; जीएसटी अनुदानात दिले फक्त १३ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 19:15 IST

औरंगाबाद महापालिकेला दरमहा जीएसटी अनुदानापोटी मिळणार्‍या १९ कोटींच्या अनुदानाला कात्री लावत चक्क १३ कोटी रुपयेच देण्यात आले.

ठळक मुद्देजून २०१७ पासून केंद्राने जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे महापालिकांचा जकात, प्रवेश कर, स्थानिक संस्था कर बंद झाला महापालिकेला आतापर्यंत प्रत्येक महिन्याला २० कोटी ३० लाख रुपये एवढे अनुदान देण्यात येत होते.मात्र मंगळवारी महापालिकेला केवळ १३ कोटी ६० लाख रुपये देण्यात आले आहेत.

औरंगाबाद : कचर्‍याच्या प्रश्नात राज्य महापालिकेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. याचवेळी औरंगाबाद महापालिकेला दरमहा जीएसटी अनुदानापोटी मिळणार्‍या १९ कोटींच्या अनुदानाला कात्री लावत चक्क १३ कोटी रुपयेच देण्यात आले. त्यामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला चांगलाच शॉक बसला आहे. कर्मचार्‍यांचा पगार, अत्यावश्यक देणी कशी द्यावी, हा प्रश्न महापालिकेला भेडसावतोय.

जून २०१७ पासून केंद्राने जीएसटीची अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे महापालिकांचा जकात, प्रवेश कर, स्थानिक संस्था कर बंद झाला असून, त्यापोटी राज्य शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे. महापालिकेला आतापर्यंत प्रत्येक महिन्याला २० कोटी ३० लाख रुपये एवढे अनुदान देण्यात येत होते. मंगळवारी महापालिकेला १३ कोटी ६० लाख रुपये देण्यात आले आहेत. तब्बल ७ कोटी रुपये कमी आल्याने महापालिकेचे मार्च महिन्याचे आर्थिक गणितच बिघडले आहे. शासनाकडून मिळणार्‍या अनुदानाच्या रकमेवर महापालिका महिन्याचा ताळेबंद आखत असत. या महिन्यात मोठी आर्थिक तूट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ही रक्कम कमी का झाली याबाबत महापालिकेला अद्याप कळविण्यात आलेले नाही. प्रभारी मुख्य लेखाधिकारी महावीर पाटणी यांनी अनुदान कमी आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. 

विकासकामांवर भरनगरसेवक मार्च एण्ड डोळ्यासमोर ठेवून विविध विकासकामे उरकण्यावर भर देत आहेत. मागील दोन ते तीन महिन्यांपासून कंत्राटदारांना बिलेच अदा करण्यात आलेली नाहीत. बिले मिळत नसल्याने नवीन कामे सुरू करण्यास कंत्राटदार नकार देत आहेत. आणखी दोन ते तीन महिने मनपाची आर्थिक स्थिती सुधारणे शक्य नाही.

वसुलीकडे दुर्लक्षमागील २० दिवसांपासून संपूर्ण महापालिका कचर्‍याच्या प्रश्न सोडविण्यात मग्न आहे. त्यामुळे मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीकडे कोणाचेच लक्ष नाही. मार्च महिना सुरू झाला तरी वसुली समाधानकारक नाही. मागील वर्षीपेक्षाही मालमत्ता कर कमी जमा होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महापालिकेचा दरमहा खर्च २.५० कोटी- कर्मचारी पेन्शन९.०० कोटी- कर्मचार्‍यांचा पगार२.५० कोटी- शिक्षकांचा पगार२.०० कोटी- पाणीपुरठ्याचे बिल१.५० कोटी- पथदिव्यांचे बिल२.०० कोटी - आऊटसोर्सिंग पगार५.०० कोटी- अत्यावश्यक खर्चएकूण- २४ कोटी किमान खर्च

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाGSTजीएसटीState Governmentराज्य सरकारMONEYपैसा