बद्रीनाथ मते , तीर्थपुरीघनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेचे कर्ज वाटपाचे अधिकार बँकेच्या मुख्य शाखेने काढून घेतले. त्यामुळे बँक कार्यक्षेत्राच्या ३१ गावांतील शेतकरी हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या बँकेला चालू आर्थिक वर्षात तीन कोटींचा नफा झालेला आहे. या शाखेच्या कार्यक्षेत्रात तीर्थपुरी, खालापुरी, मुरमा, अंतरवाली टेंभी, कंडारी, पाडुळी, कोठी, मुदे्रगाव, मंगरूळ, रामसगाव, शेवता, लिंगसेवाडी, बाणेगाव, सौंदलगाव, भोगगाव, जोगलादेवी, साडेगााव, भायगव्हाण, दहिगव्हाण, एकलहेरा, खडका, भार्डी, वडीकाळ्या, बोडखा. चिंचोली, गंगा चिंचोली आदी ३१ गावांचा समावेश आहे.बँकेचे सुमारे २० हजार खातेदार आहेत. बँंकेचे ५ हजार कर्जदार आहे. वसुलीचे प्रमाणही चांगले आहे. त्यामुळेच बँकेला ३ कोटींचा नफा झालेला आहे.या शाखेला तीन लाख रूपयांपर्यंत कर्ज देण्याचा अधिकार होता. मात्र आता बँकेच्या मुख्य कार्यालयानेच तो अधिकार शाखेकडून काढून घेतला. त्यामुळे नवीन कर्ज वाटप शाखेने बंद केले आहे. त्यामुळे कर्ज मागणी, दाखल प्रस्ताव आदींच्या फायली शाखेला मंजुरीसाठी मुख्य कार्यालयात पाठविले जातात. त्यामुळे प्रस्तावधारक शेतकरी, व्यापारी यांनाही बँकेत चकरा माराव्या लागत आहेत.
स्टेट बँकेचे कर्ज वाटपाचे अधिकार काढले
By admin | Updated: August 14, 2014 01:55 IST