शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

पॅलेटिव्ह केअर ‘ओपीडी’ला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 00:48 IST

शासकीय कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था) पॅलेटिव्ह केअर बाह्यरुग्ण सेवेचे (ओपीडी) सोमवारी उद््घाटन करण्यात आले. या नव्या सेवेमुळे कर्करोगाचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबास मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालय (राज्य कर्करोग संस्था) पॅलेटिव्ह केअर बाह्यरुग्ण सेवेचे (ओपीडी) सोमवारी उद््घाटन करण्यात आले. या नव्या सेवेमुळे कर्करोगाचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबास मोठा दिलासा मिळणार आहे.आजारातील शेवटच्या टप्प्यातील रुग्णांवरील वैद्यकीय उपचाराची मर्यादा संपते. तेव्हा रुग्णांच्या वेदना पाहणे कुटुंबियांना शक्य होत नाही, अशा दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी ‘पॅलेटिव्ह केअर’ची संकल्पना पुढे आली. कर्करोगाच्या रुग्णाच्या वेदना करण्याच्या दृष्टीने पॅलेटिव्ह केअर बाह्यरुग्ण सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.या ओपीडी सेवेतून रुग्णांच्या वेदना कमी करण्यासह त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन आणि रुग्णांप्रती जागृती के ली जाणार आहे.उद््घाटनप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. चंद्रकांत थोरात, डॉ. संगीता पाटील, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. अर्चना राठोड, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. ऋषिकेश खाडिलकर, डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. ज्ञानेश्वर मुळे, डॉ. आदिती लिंगायत, डॉ. विजय कल्याणकर, अभ्यागत समितीचे डॉ. भागवत कराड, राम बुधवंत, रामेश्वर लांडगे, सुनंदा खरात, नारायण कानकाटे आदी उपस्थित होते.उद््घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. येळीकर म्हणाल्या. टाटा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी घेतलेल्या सहा आठवड्यांच्या प्रशिक्षणानंतर अखेर पॅलेटिव्ह केअर ओपीडी सुरू झाली. अगदी याचप्रमाणे डॉक्टरांनी नवनवीन उपचार पद्धती शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातून रुग्णसेवेत वाढ होण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या.