शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात निवडणुकीची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 23:50 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब झाला आहे. याविषयी राज्य सरकार, राज्यपाल कार्यालयांकडे तक्रारी गेल्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची लगबग सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब झाला आहे. याविषयी राज्य सरकार, राज्यपाल कार्यालयांकडे तक्रारी गेल्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची लगबग सुरू आहे. कुलगुरूंनी निवडणूक निर्णय अधिका-यांना सर्व कामे बाजूला ठेवून हेच काम करण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.राज्य सरकारने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा-२०१६ मंजूर केल्यानंतर ३१ आॅक्टोबरपर्यंत सर्व अधिकार मंडळांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून १ सप्टेंबर रोजी कार्यकारी मंडळे अस्तित्वात आणण्याचे आदेश संबंधित विद्यापीठांना दिले होते. या आदेशानुसार राज्यातील इतर अकृषी विद्यापीठांनी निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अधिसभेसाठीच्या एकाही गटातील मतदार याद्या अद्याप प्रकाशित केलेल्या नाहीत. यातच निवडणूक प्रक्रिया संपविण्याची मुदत जवळ आली आहे. यामुळे कुलगुरूंनी निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या कुलसचिवांना सर्व कामे स्थगित ठेवून केवळ निवडणुकीचे कामकाज उरकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे आगामी दोन-तीन दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे समजते.संघटनांचे साकडेविद्यापीठाच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करून घेण्यासाठी बामुक्टो, मुप्टा संघटनेतर्फे कुलगुरूंना सोमवारी निवेदन देण्यात आले. इतर विद्यापीठातील निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. तरीही आपल्याकडे निवडणुकीसाठी मतदार याद्याच प्रकाशित करण्यात आलेल्या नाहीत. या याद्या तात्काळ प्रकाशित करून निवडणुका घेण्याची मागणी संघटनांच्या शिष्टमंडळाने केली. या शिष्टमंडळात बामुक्टाचे प्रा. अंकुश कदम, डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. अप्पासाहेब हुंबे, डॉ. राजेश रगडे, मुप्टाचे प्रा. सुनील मगरे, डॉ. संभाजी वाघमारे आदींचा समावेश होता. बामुक्टा, मुप्टाच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतल्यानंतर विद्यापीठ विकास मंचचे डॉ. गजानन सानप यांच्या गटानेही कुलगुरूंची भेट घेतली.