शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेस थाटात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:17 IST

अ. मराठी बुध्दिबळ संघटना व जिल्हा बुध्दिबळ संघ जालनाच्या वतीने स्व. चरण पहेलवान भक्त यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील एका हॉटेलमध्ये ३१ वी राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अ. मराठी बुध्दिबळ संघटना व जिल्हा बुध्दिबळ संघ जालनाच्या वतीने स्व. चरण पहेलवान भक्त यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहरातील एका हॉटेलमध्ये ३१ वी राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन झाले.अध्यक्षस्थानी म्हणून माजी आ. कैलास गोरंट्याल तर प्रमुख पाहुणे म्हणून अ. मराठी बुध्दिबळ संघटनेचे कार्याध्यक्ष विजय देशपांडे, छत्रपती पुरस्कार प्राप्त जयंत गोखले, मनीष बगडिया, भाऊसाहेब घुगे, अभिमन्यू खोतकर, संतोष मोहिते यांची उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. राज्यमंत्री खोतकर म्हणाले, की स्व. चरण पहेलवान भक्त यांनी जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा बुध्दिबळ व तालीम संघाची स्थापना करुन जिल्ह्यातील खेळाडूंना बुद्धी आणि शक्तीचे धडे दिले. जिल्ह्यात २५ वषार्नंतर त्याचे पुत्र प्राचार्य डॉ. दयानंदजी भक्त यांनी राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धा आयोजित केल्याने जिल्ह्यातील बुध्दिबळ खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. राज्यभरातून आलेल्या खेळाडूंना पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी खोतकर यांनी शुभेच्छा दिल्या. माजी आ. गोरंट्याल यांनी या उपक्रमाचे कौतुक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी बुद्धिबळ पटावर खोतकर व गोरंट्याल यांनी मॅच खेळून स्पर्धेला सुुरुवात केली.राज्यभरातून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेस २१० खेळाडूंनी नोंदणी केली असून, यात ६० आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धेत यजमान जालन्यासह औरंगाबाद, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, धुळे, रायगड, सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांतील ११ वर्षांखालील मुले व मुलींचे संघ सहभागी झाले आहेत. पाच दिवस चालणाºया या साखळी पध्दतीच्या स्पर्धेतून निवडले जाणारे २ मुले व ५ मुली यांची ११ वषार्खालील राष्ट्रीय स्पधेर्साठी महाराष्ट्राच्या संघात निवड केली जाणार आहे.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा बुध्दिबळ संघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दयानंद भक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य पंच शोभराज खोंडे (नंदूरबार), प्रा. डॉ. आत्मानंद भक्त, जिल्हा बुध्दिबळ संघाचे सचिव प्रा. डॉ. रत्नाकर कुलकर्णी, सतीश ठाकुर, प्रा. डॉ. शाम काबुलीवाले, प्रा. डॉ. भिकूलाल सले, गोपाल काबलिये, भैयालाल कडपे, प्रा. गजानन जगताप, प्रा. साहेबराव बनसोड हे परिश्रम घेत आहेत. सहायक पंच म्हणून अभिजित वैष्णव, अमरीश जोशी, केशव लहाने, केदार कल्याणकर, दीपक कुमठाकर, नंदलाल बठेजा, प्रशांत नवगिरे, विनोद कदम हे काम पाहत आहेत.