शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नमामी गोदे उपक्रमाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:22 IST

नदी ही आपली जीवनदायिनी असून तिचे संवर्धन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे ही भावना जागृत करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विकासार्थ विद्यार्थीने आयोजित केलेल्या नमामी गोदे उपक्रमाला सोमवारी बंदाघाट येथे सुरुवात करण्यात आली़ यावेळी हजारो नांदेडकरांनी मानवी साखळी तयार करुन गोदेची सामूहिक आरती केली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नदी ही आपली जीवनदायिनी असून तिचे संवर्धन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे ही भावना जागृत करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विकासार्थ विद्यार्थीने आयोजित केलेल्या नमामी गोदे उपक्रमाला सोमवारी बंदाघाट येथे सुरुवात करण्यात आली़ यावेळी हजारो नांदेडकरांनी मानवी साखळी तयार करुन गोदेची सामूहिक आरती केली़कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा बलविंदरसिंघजी यांचे प्रतिनिधी बाबा पालसिंघजी, प्रमुख वक्ते विकासार्थ विद्यार्थीचे प्रांत निमंत्रक इशान गणपुले , अभाविप महानगर अध्यक्षा प्रा.डॉ.सौ.गीता सांगवीकर, गणेश बोडके यांची उपस्थिती होती़ यावेळी इशान गणपुले म्हणाले, विकासार्थ विद्यार्थी पर्यावरणविषयक कार्यक्रम राबवत असते. विद्यार्थ्यांच्या मनामधे पर्यावरणाची जाणीव व्हावी व पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमधे प्रेम निर्माण व्हावे, हा विकासार्थ विद्यार्थ्याचा मानस आहे. आज गोदावरी व तिच्या आसपासचा परिसर घाणीने भरलेला आहे़ गोदावरीत ड्रेनेजचे नाले सोडण्यात आले आहेत़ हे चित्र बदलण्यासाठी नमामी गोदे हा उपक्रम अभाविपने हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून गोदावरी उगम ते शेवट असे सर्वेक्षण केले जाणार आहे. या उपक्रमामधून जी माहिती गोळा होईल ती माहिती केंद्राकडे पाठवून नमामी गंगेच्या धर्तीवर केंद्राने नमामी गोदे हा उपक्रम सुरु करावा असा प्रयत्न केला जाईल असे सांगितले़ यावेळी नागरिकांनी गोदावरीची मंत्रोच्चारात ढोल- ताशांच्या गजरात महाआरती केली़ तसेच गोदावरीच्या संवर्धन व संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याची शपथ घेतली. यावेळी शिवरुद्रा व केसरी ढोल-ताशा पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले़कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभाविपचे शिवकुमार पत्रे, गंगाधर कोलमवार, गणेश बोडके, यज्ञेश पांडे , गगन येमेकर, प्रसाद जाधव, चिन्मय बासवाडेकर, जनार्दन जाधव, सिद्धेश्वर तिके, भीमाशंकर कुलकर्णी , अभिजीत पांडे, कृष्णा बंगीनवर, अमरदीप वायगावकर, भाग्यश्री श्रीभाते यांनी परिश्रम घेतले़