लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्यात १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत महा रेशीम अभियान राबवले जाणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या अभियानाची गुरूवारी सुरवात करण्यात आली .रेशीम संचालनालयाच्या माध्यमातून शेतकºयांना शाश्वत उत्पन्नाचे साधन निर्माण करून उत्पन्नात वाढ करणे या उद्देशाने महारेशीम अभियान - २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात नांदेड, अधार्पूर, मुदखेड, लोहा, कंधार, देगलूर, मुखेड या तालुक्यात हे अभियान राबवले जाणार आहे.या अभियानाची सुरवात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा रेशीम अधिकारी पी. जे. पाटील , केंद्रीय वैज्ञानिक ए. जे. करंडे, वरिष्ठ तांत्रिक सहायक पी. बी. नरवाडे , सुजाता पोहरे, जिल्हा प्रकल्प अधिकारी टी.ए. पठाण, एस. यू. मानकर , एस. डब्ल्यू़ लाठकर, क्षेत्र सहायक डोईफोडे, प्रगतशील शेतकरी यांच्यासह समतादूत उपस्थित होते .
जिल्ह्यात महारेशीम अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:50 IST