श्रीक्षेत्र माहूर : माहूरगडावरील पवित्र देवस्थानांवर श्रावण भाद्रपद महिना सुरू झाल्याने भाविकांची वर्दळ वाढली असून ८ आॅगस्ट रोजी शहरासह गडावर नारळी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक येणार आहेत. प्रशासनाकडून भाविकांना नियमित देण्यात येणाऱ्या सुविधांची तयारी तर सोडाच गडावरील वाहतुकीस योग्य नसलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नसल्याने एसटीने गडावर भाविकांना सुविधा कशा द्याव्यात, हा प्रश्न आगारप्रमुखांना पडला आहे़आॅगस्ट महिन्यात श्रावण भाद्रपद निमित्त गडावर भाविकांची सतत वर्दळ असते़ नागपंचमी उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो़ श्रावणी सोमवार, मंगळागौर पूजन, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती, संकष्ट चतुर्थी, स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती, गोपालकाला, पतेती, एकादशी, भाद्रपद मासारंभ, श्री गणेश, नवरात्र प्रारंभ, चक्रधर स्वामी महाराज जयंती, गजानन महाराज पुण्यतिथीसह सुफीसंत ताजुद्दीन बाबा पुण्यतिथी याशिवायही अनेक मठ, दर्गाह, मंदिरावर महिनाभर भाविकांच्या उपस्थितीत उत्सव साजरे केले जातात़ महिनाभर शहरासह गडावर वर्दळ राहणार असून नारळी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांना गडावर ने- आण करण्यासाठी शंभरांवर एसटी बसेस शहरातून गडावर जातात़ शहरातून श्री रेणुकामाता मंदिराच्या पुढे गरूड गंगेपर्यंत रस्ता बनविण्यात आला असून यापुढे श्री दत्त शिखर मंदिर व अनुसया माता मंदिरापर्यंत एकेरी व मोठे खड्डे असलेला रस्ता असून या रस्त्याच्या एकीकडे घातक दरी तर दुसरीकडे भुसभुशीत झालेल्या पहाडातून दरडी कोसळण्याची भीती यामुळे आगारप्रमुख एस़डी़पडवळ यांनी एसटीसह गडावरील रस्त्यांची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. यावेळी रामेश्वर गवळी, ए़एनग़ोसावी, डीक़ोकणे, अंबादास जाधव, आऱए़भालेराव, ए़डी़थापडे, एसक़ात्रे, एस़डी़ राठोड, बी़यु़मडावी, व्यंकटेश पस्पुलवार यांच्यासह चालक, कर्मचारी, वाहक उपस्थित होते़ (वार्ताहर)
नारळी पौर्णिमा उत्सवास प्रारंभ
By admin | Updated: August 2, 2014 01:06 IST