शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सचखंड एक्स्प्रेसवर दगडफेक

By admin | Updated: April 24, 2016 00:16 IST

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल चोरीसाठी रेल्वेच्या दरवाजातील प्रवाशांवर दगडफेक आणि काठीहल्ला करण्याचे प्रकार सरू असताना शनिवारी सचखंड एक्स्प्रेसच्या इंजिनवर दगडफेक झाल्याने चालक जखमी

औरंगाबाद : गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल चोरीसाठी रेल्वेच्या दरवाजातील प्रवाशांवर दगडफेक आणि काठीहल्ला करण्याचे प्रकार सरू असताना शनिवारी सचखंड एक्स्प्रेसच्या इंजिनवर दगडफेक झाल्याने चालक जखमी झाल्याची घटना दौलताबाद-औरंगाबाददरम्यान घडली.याविषयी अधिक माहिती अशी, अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेसने सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास दौलताबाद रेल्वेस्टेशन सोडले; परंतु अवघ्या काही अंतरावर उभ्या असलेल्या तरुणांच्या घोळक्यातील एकाने इंजिनवर दगड भिरकावला. यावेळी इंजिनच्या कक्षावरील काचेतून हा दगड आरपार होत थेट चालक राम मोहन राव यांच्या डोक्याला लागला. त्यामुळे ते जखमी झाले. सचखंड एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वेस्टेशनला आल्यानंतर हा प्रकार रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. राम मोहन राव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अन्य चालकाची व्यवस्था करून सचखंड एक्स्प्रेस रवाना करण्यात आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी तपास करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे रुळाच्या बाजूला उभे राहून मोबाईलवर मग्न असलेल्या प्रवाशाला दगड अथवा काठी मारायची आणि मोबाईल पळवायचा असा उद्योग काही जणांकडून सुरू आहे. अशा दगडफेकीने प्रवाशांचे मोबाईल तर चोरीला जातात; परंतु दगड, काठी मारल्याने प्रवासी जखमी होण्याचे प्रकार होतात.शनिवारी झालेली दगडफेकीची घटना मोबाईल पळविण्याच्या हेतूनेच झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दगडफेकीसारख्या प्रकारावर आळा घालण्यासाठी लोकांचे समुदेशनही केले जात असल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक धर्मेंद्रकुमार यांनी सांगितले.