शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण जीवनवाहिनी तिस-या दिवशीही ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:34 IST

एसटी बससेवा गुरुवारी (दि.१९) सलग तिस-या दिवशीही ठप्प राहिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गोरगरीब आणि ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एसटी बससेवा गुरुवारी (दि.१९) सलग तिस-या दिवशीही ठप्प राहिली. मध्यवर्ती बसस्थानकात संपकरी एसटी कर्मचाºयांनी काळ्या रंगाचा आकाशकंदिल आणि काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. सगळीकडे रोषणाई असताना एसटी प्रशासन आणि राज्य सरकारच्या भूमिकेमुळे काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आल्याची भावना कर्मचा-यांनी व्यक्त केली.एसटी महामंडळातील कर्मचाºयांना तब्बल तिस-या दिवशीही मागण्यांची पूर्तता होण्याची प्रतीक्षा करावी लागली. सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग देण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील पाचशे बसपैकी एकही बस तीन दिवसांपासून रस्त्यावर आलेली नाही. संपामुळे एसटी महामंडळाचे दोन कोटींवर उत्पन्न बुडाले.मध्यवर्ती बसस्थानकात एसटी कर्मचा-यांनी काळ्या रंगाचा आकाशकंदिल आणि काळ्या रंगाच्या फिती लावून आंदोलन केले. यावेळी कर्मचा-यांनी जोरदार निदर्शने केली. प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने काळी दिवाळी साजरी करावी लागल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे राज्य संघटक सचिव सुरेश जाधव म्हणाले.