औरंगाबाद : प्रवासी वाहतूक करणाऱ्या अडीच हजार काळीपिवळी टॅक्सी आणि सहा आसनी टमटमला (मिनीडोअर) शहरात प्रवेशबंदी घालण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतला. याचा सर्वाधिक फायदा एसटी महामंडळाला होत असून, विविध मार्गांवर बसफेऱ्या वाढविल्याने महामंडळाच्या उत्पन्नात भर पडत आहे.रस्त्यावर थांबून प्रवासी मिळविणाऱ्या काळीपिवळी जीप आणि सहा आसनी वाहनांमुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी ४ मे रोजी प्रवासी वाहतूक करणारी सहा आसनी वाहने आणि काळीपिवळी जीप यांना शहरात प्रवेशबंदी घालणारा आदेश लागू केला आहे. या निर्णयानंतर महामंडळाने काळीपिवळी धावणाऱ्या मार्गांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. महामंडळाकडून फुलंब्री, खुलताबाद, पैठण, बिडकीन यासह विविध मार्गांवर बसगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. फुलंब्री, बिडकीन, पैठण या मार्गांवर बसगाड्यांच्या जवळपास २८ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. काळीपिवळीवरील बंदीमुळे या मार्गांवर गेल्यावर्षाच्या तुलनेत जवळपास ६० हजार रुपयांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. या मार्गांवर मागणीप्रमाणे बसगाड्यांमध्ये वाढ केली जाईल.-एस.एस. रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ
काळीपिवळीवरील बंदीने एसटी सुसाट
By admin | Updated: May 12, 2015 00:53 IST