शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: एसटीप्रमाणे भाडे घ्या, प्रवाशांची लूट केली तर खाजगी वाहनांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 16:31 IST

ST Strike: आरटीओ कार्यालयाचे १७ निरीक्षक रस्त्यांवर असून त्यांची खासगी वाहन चालकांच्या मनमानीवर नजर आहे.

औरंगाबाद : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा (ST Strike )फायदा घेत प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी वाहनांचा बंदोबस्त करण्यासाठी आरटीओ कार्यालयाचे १७ निरीक्षक रस्त्यावर उतरले आहेत. प्रवाशांना वाहतूक सुविधेचे नियोजन करून देण्यासह एसटीप्रमाणे किफायतशीर भाडे आकारणी होईल, यावर ते नजर ठेवून आहेत. प्रवाशांची लूट करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून किती भाडे आकारण्यात यावे, याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, खासगी वाहतूकदार मनमानी भाडे आकारून प्रवाशांचा खिसा रिकामा करीत आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने १० नोव्हेंबर रोजी ‘मनमानी भाडे वसुली रोखणार कोण? ’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर आरटीओ कार्यालयाकडून सिडको, मध्यवर्ती बसस्थानकासह ग्रामीण भागांतील बसस्थानकांवर संपर्क अधिकारी म्हणून मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्याबरोबर ज्या ज्या ठिकाणाहून प्रवाशांची वाहतूक होते, तेथेही निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणाहून प्रवाशांची वाहतूक सुरळीतपणे होईल, यादृष्टीने निरीक्षकांकडून बुधवारी प्रयत्न करण्यात आला. पुण्यासह विविध ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी आरटीओ कार्यालयाकडून वाहनांचे नियोजनदेखील करण्यात आले.

बसस्थानकात पोलीस बंदोबस्तएसटी कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशीही बुधवारी संप सुरूच राहिला. मध्यवर्ती बसस्थानकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. खासगी वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यातून गोंधळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत हाेती. बसस्थानकाबाहेरील रस्त्यावरून खासगी वाहनांतून प्रवाशांची वाहतूक सुरू होती.

जास्त भाडे घेणाऱ्यांवर कारवाई‘एसटी’प्रमाणे खासगी वाहनचालकांनी भाडे आकारावे, अशी सूचना करण्यात आली आहे. प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याकडे लक्ष दिले जात आहे. बसस्थानकाच्या आत खासगी वाहने नेऊन प्रवासी घेऊन जाता येणार नाही. कारण त्यातून वादविवाद होऊ शकतात.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस