शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘एसटी’ने केली पर्यटननगरीची ‘फसवणूक’; अजिंठा-वेरूळ मार्गावरून एसी पर्यटन बस गायब

By संतोष हिरेमठ | Updated: April 14, 2023 13:35 IST

विदेशी आणि देशी पर्यटकांना जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी खासगी वाहने किंवा एसटीच्या लाल बसमधून प्रवास करावा लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर : जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी पर्यटननगरीत येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या १.८० कोटीच्या निधीतून सात वर्षांपूर्वी दोन वातानुकूलित बसची खरेदी करण्यात आली. परंतु या अजिंठा, वेरूळ मार्गावरून पर्यटन बस गायब झाल्या आहेत. मध्यवर्ती बस स्थानकातून साध्या बसेसने ही पर्यटनस्थळे गाठण्याची वेळ पर्यटकांवर ओढावत आहे. अजिंठा, वेरूळ मार्गावरून पर्यटन बस गायब करून ‘एसटी’ने पर्यटननगरीची ‘फसवणूक’ केल्याची ओरड पर्यटकांतून होत आहे.

वेरूळ, अजिंठा या लेण्यांमुळे शहराचे नाव जगभरात गेले आहे. जगभरातील पर्यटक पर्यटननगरीत दाखल होतात. ‘अतिथी देवो भव’प्रमाणेच त्यांना वागणूक दिली पाहिजे. पर्यटकांना वातानुकूलित बसमधून प्रवास करता यावा, यासाठी व्हॉल्वो बस खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. आर्थिक चणचणीत असलेल्या एसटी विभागाने व्हॉल्वो खरेदी करण्यात असमर्थता दर्शविली होती. यामुळे पर्यटकांच्या सुविधेसाठी दोन व्हॉल्वो (वातानुकूलित बस) विकत घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी ८० लाखांचा निधी दिला होता. यातून प्राप्त झालेल्या दोन बसेस अजिंठा, वेरूळ मार्गावर चालविण्यात आल्या. परंतु, या बसेस आता कुठे आहेत, याची शोधाशोध करण्याची वेळ पर्यटकांवर ओढावत आहे.

खाजगी वाहने, लाल बसमधून प्रवासविदेशी आणि देशी पर्यटकांना जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी खासगी वाहने किंवा एसटीच्या लाल बसमधून प्रवास करावा लागत आहे.

एसटी महामंडळाचे अधिकारी म्हणाले...एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर म्हणाले, देखभाल-दुरुस्तीमुळे बस पुण्याला पाठविण्यात आल्या. त्यातील एक बस नुकतीच मिळाली. विभागाला लवकरच ई-बस मिळणार आहेत. यातून अजिंठा, वेरूळसाठी बस चालविण्यात येईल. मध्यवर्ती बस स्थानकाचे आगार व्यवस्थापक अविनाश साखरे म्हणाले, दोन वातानुकूलित बसपैकी एक दुरुस्तीसाठी पुण्याला आहे. दुसरी बस पुणे मार्गावर चालविण्यात येत आहे.

एसटी अधिकाऱ्यांची भेटएसटी महामंडळाच्या बंद असलेल्या पर्यटन बस पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. लवकरच बसेस सुरू केल्या जातील, असे त्यांनी सांगितले आहे.- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ

टॅग्स :tourismपर्यटनAjantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबाद