परभणी: शहरातील कॅरीबॅग वापरावर प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेने पथक स्थापन केल्याची माहिती आयुक्त अभय महाजन यांनी दिली.परभणी शहरात कॅरीबॅगचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव घेतलेला आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग वापरावर बंदी असतानाही शहरात कॅरीबॅगचा सर्रास वापर होतो. भाजी-पाला, फळे इतर छोट्या वस्तू विक्री केल्यानंतर त्या प्लास्टिकच्या पिशवीत नेण्याची प्रथाच पडली आहे. कॅरीबॅग वापरावरील बंदी घातल्यानंतर काही दिवस महानगरपालिकेने याविरुद्ध कारवाई केली होती. परंतु, कारवाई होत नसल्याने पुन्हा कॅरीबॅगचा वापर वाढला. छोट्या-मोठ्या दुकानातून तसेच हातगाड्यावरुन कॅरीबॅग दिल्या जातात. मध्यंतरी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह नगरसेवकांनी शहरात फिरुन कॅरीबॅग जप्तीची मोहीम हाती घेतली होती. तरीही कॅरीबॅगचा वापर होत असल्याने महानगर पालिकेने आता स्वतंत्र पथकाची स्थापना केली असून कॅरीबॅग विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
कॅरीबॅग विरोधासाठी पथक
By admin | Updated: September 19, 2014 00:27 IST