शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग रनला उत्स्फूर्त प्रतिसाद, जिद्दीने केले अंतर पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:01 IST

: नवजीवन सोसायटीतर्फे रविवारी झालेल्या दिव्यांग रनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर बडवे, दर्शन क्षीरसागर व आ. अतुल सावे यांच्या उपस्थितीत स. भु. येथून सकाळी ७ वाजता सुरू झालेली ३ कि. मी. अंतराची ही दिव्यांग रन मतिमंद, अंध, अस्थिव्यंग व कर्णबधिर या चार गटांत झाली. या गटातील सर्वच धावपटूंनी निर्धारित अंतर जिद्दीने पूर्ण केले.

औरंगाबाद : नवजीवन सोसायटीतर्फे रविवारी झालेल्या दिव्यांग रनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंतरराष्ट्रीय खेळाडू सागर बडवे, दर्शन क्षीरसागर व आ. अतुल सावे यांच्या उपस्थितीत स. भु. येथून सकाळी ७ वाजता सुरू झालेली ३ कि. मी. अंतराची ही दिव्यांग रन मतिमंद, अंध, अस्थिव्यंग व कर्णबधिर या चार गटांत झाली. या गटातील सर्वच धावपटूंनी निर्धारित अंतर जिद्दीने पूर्ण केले.दिव्यांग धावपटूंसोबत एक व्यक्ती, महिला हात धरून उत्स्फूर्तपणे धावत होत्या. विशेष म्हणजे औरंगाबादेतील मॅरेथॉनमध्ये नियमीत सहभागी दिग्गजांनीही दिव्यांग रनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. या धावपटूंचा रस्त्यात उभ्या असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी उत्साह वाढवला. दिव्यांग रन सुरू होणाºया आधी फिटनेस एक्स्पर्ट प्रीती भानुशाली यांच्या नेतृत्वाखालील रिलॅक्स झीलने नृत्य व संगीततालाच्या नादात धावपटूंकडून वार्मअप करून घेत उत्साह वाढवला आणि त्यानंतर त्यांच्याकडून स्ट्रेचिंगही करून घेतले.याप्रसंगी रिलॅक्स झीलचे संचालक संजय पाटीलदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या धावपटूंसाठी मोफत रेखा हिवरे यांच्यातर्फे नाश्ता ठेवण्यात आला होता, तर औरंगाबाद ब्लॅक बक्सतर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ही दिव्यांग रन यशस्वी करण्यासाठी नवजीवन सोसायटीच्या संचालिका शर्मिष्ठा गांधी, अध्यक्ष नलिनी शाह, सचिव रामदास अंबुलगेकर, जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव फुलचंद सलामपुरे, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, अभिजित जोशी, अंजली वळसंगकर, नीला रहाणे, सुनंदा पाटील, चित्रा सुरडकर, प्रमोद माटे, तुकाराम कुबडे यांच्यासह शशी शिनगारे, सचिन देशमुख, मधुकर वाकळे, राम जाधव, पूनम राठोड, राहुल नरवडे, गौतम शिरसाठ, विशाल देशपांडे, राहुल अहिरे आदींनी परिश्रम घेतले.