उस्मानपुरा येथील गोपाल कल्चरल हॉलमध्ये कोल्हापूरच्या अभिषेक बुक सेंटरच्या वतीने भरविलेले पुस्तक प्रदर्शन दररोज सकाळी १० ते ९ वाजेपर्यंत खुले आहे. मराठी व इंग्रजी भाषेतील नामवंत लेखकांची दर्जेदार पुस्तके १५ ते ५० टक्के सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली असून, त्यात कथा, कादंबरी, नाटक या साहित्य प्रकाराबरोबरच इतिहास, राजकारण, चरित्र, प्रवास वर्णन अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा समावेश आहे. लहान मुलांसाठी चित्रमय, बालसाहित्य याबरोबरच पाककला, ज्योतिष, धार्मिक, वैचारिक, पेंटींग यांसह अन्य विषयांवरील पुस्तके या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. इंग्रजीतील नामवंत लेखकांची पुस्तके केवळ ५० ते १०० रुपयात उपलब्ध आहेत. तसेच १०० ते २०० रुपये किलो ही योजनाही वाचकांसाठी या लोकप्रिय प्रतिसाद मिळत असलेल्या प्रदर्शनात उपलब्ध आहे. (फोटो जाहिरात बातमी)
कोल्हापूरच्या अभिषेक बुक सेंटरच्या पुस्तक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:05 IST