पैठण : स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती महोत्सवानिमित्त रामकृष्ण मठ आश्रम, पुणे व रामकृष्ण मिशन आश्रम, औरंगाबाद यांच्या वतीने आयोजित रथयात्रेचे पैठणमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.स्वामी विवेकानंदांचा उभा पुतळा असलेला अश्वारूढ रथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या यात्रेत स्वामी आर्यानंद, स्वामी सर्वेशानंद, स्वामी चेतात्मानंद, कल्याण काळे, राजेश काकडे, महेश गायकवाड अग्रभागी सहभागी झाले होते. विविध वेशभूषांतील विद्यार्थी, लेझीम, ढोल पथकासहित तोफ व फटाक्यांची आतषबाजी करीत या रथयात्रेचे स्वागत झाले. रथयात्रेत श्रीनाथ हायस्कूल, आर्य चाणक्य, कन्या प्रशाला या शाळा सहभागी झाल्या होत्या. रथयात्रेचे स्वागत माजी मंत्री अनिल पटेल, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रवींद्र काळे, जयाजी सूर्यवंशी, दूध संघ संचालक नंदलाल काळे, नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, कांतराव औटे, उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, कल्याण बरकसे, शहरप्रमुख प्रकाश वानोळे, संत एकनाथचे संचालक तुषार पा. शिसोदे, संभाजी सव्वाशे, भिकाजी आठवले, नगरसेवक अप्पासाहेब गायकवाड, सुनील रासने, चंद्रकांत तांगडे, रावसाहेब आडसूळ, सोमनाथ भारतवाले, दिनेश पारीख यांनी केले. विवेकानंद विचारमंच, पैठणच्या वतीने विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय पा. शिसोदे, कोषाध्यक्ष तुषार पा. शिसोदे, अरुण खराद यांनी आयोजन केले होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. संतोष गव्हाणे, प्राचार्य एल. डी. म्हस्के, उपमुख्याध्यापिका धपाटे, शिंदे, सुनील चितळे, वाढेकर, करकोटक, प्रा. पंढरीनाथ फुलझळके, गणेश कुलकर्णी, प्रा. बटुळे, प्रा. ठोंबरे, प्रा. सानप, प्रा. सूर्यवंशी, प्रा. कीर्तिकर यांनी प्रयत्न केले.
स्वामी विवेकानंद रथयात्रेचे पैठण शहरात उत्स्फूर्त स्वागत
By admin | Updated: August 13, 2014 01:45 IST