शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

नारळी सप्ताहातून सामाजिक सलोख्याला अध्यात्माची जोड !

By admin | Updated: April 8, 2015 00:53 IST

प्रताप नलावडे , बीड अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखण्यासाठी गेली ८२ वर्षापासून भगवान गडावरून नारळी सप्ताहाचे आयोजन केले जात असून सध्या बीड तालुक्यातील हिंगणी

प्रताप नलावडे , बीडअध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक सलोखा राखण्यासाठी गेली ८२ वर्षापासून भगवान गडावरून नारळी सप्ताहाचे आयोजन केले जात असून सध्या बीड तालुक्यातील हिंगणी खुर्द या छोट्याशा गावात हा सप्ताह सुरू आहे. दररोज एक लाखापेक्षा भाविक या सप्ताहात हजेरी लावत असून ९ एप्रिलला या सप्ताहाच्या समारोपासाठी तीन लाखापेक्षाही अधिक भाविक हिंगणी खुर्दमध्ये दाखल होणार आहेत.सामाजिक सलोखा राखणे आणि अध्यात्माच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम या सप्ताहातून होत असल्याचे न्यायचार्य नामदेव महाराज शास्त्री आवर्जून सांगतात. संत भगवान बाबा यांनी सुरू केलेल्या या नारळी सप्ताहाची व्याप्ती आता इतकी वाढली आहे की यासाठी उपस्थित राहणाऱ्यांची संख्या लाखावर पोहोचली आहे. सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येऊन हा सप्ताह गेली ८२ वर्षापासून करत आहेत. भगवान गडावरून सप्ताहाच्या आयोजनासाठी नारळ घ्यायचा आणि त्यानंतर त्याची तयारी करायची, अशी परंपरा चालत आली आहे. गेली नऊ वर्षापूर्वी हिंगणी खुर्द गावाला हा मानाचा नारळ मिळाला होता. तेव्हापासून गावकरी सप्ताहाच्या आयोजनाच्या तयारीत गुंतले आहेत. यासाठी वर्गणी गोळा करतानाही शेतकऱ्यानी आपल्या शेतीशी याचा मेळ घातला. एका एकरासाठी तीन हजार रूपये वर्गणी स्वखुशीने गावकऱ्यांनी दिली. नऊ वर्षात चाळीस लाखापेक्षाही अधिक रक्कम जमा करण्यात आली. यातूनच हा खर्च भागविला जातो.काही लोकांनी वस्तूच्या स्वरूपात मदत केली आहे. संभाजी चव्हाण यांनी २५ किंव्टल साखर, राजेंद्र मुंडे यांनी ५१ किंव्टल गहु, अशोक लोढा यांनी तेलाचे डबे असे जमेल तसे प्रत्येकाने या सप्ताहाचा भार उचलला आहे. रक्कम कमी पडली तर भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य नामदेव महाराज स्वत: खर्च करतात.दररोज भजन, कीर्तन, रामकथा, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. स्वत: नामदेव महाराज शास्त्री जातीने सर्व व्यवस्थेवर लक्ष देतात. हिंगणी हे अवघ्या दोन हजार लोकसंख्येचे गाव. या गावाला सध्या जत्रेचे स्वरूप आले आहे. गावाकडे जाणाऱ्या छोट्याशा कच्च्या रस्त्यावर मोटार गाड्यांची रांग लागली आहे. २५ एकराच्या परिसरात सप्ताह साजरा केला जात आहे. १० एकर परिसरात मंडपाची उभारणी केली असून कार्यक्रमासाठी, भोजनासाठी आणि स्वयपाकासाठी वेगवेगळे विभाग केले आहेत.संपूर्ण गावातील लोक नियोजनात सहभागी तर झाले आहेतच, परंतु बाहेर गावावरून आलेल्या लोकांचीही लगबग सुरू आहे.