शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
2
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
3
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
4
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
5
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
6
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
7
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
9
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
10
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
11
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
12
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
13
काँग्रेससोबत उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी ‘मुंबई विरासत मिलन’ 
14
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
15
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
16
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
17
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
18
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
19
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
20
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत

खर्च जरा जपूनच!

By admin | Updated: October 7, 2014 00:16 IST

बीड : लोकसभा पोटनिवडणुकीत प्रमुख उमेदवारांसह अपक्षांनीही खर्चाच्या बाबतीत ‘जरा जपूनच’ असे धोरण स्वीकारले आहे़ आतापर्र्यंत भाजपाच्या प्रीतम मुंडे यांनी केवळ ७०

बीड : लोकसभा पोटनिवडणुकीत प्रमुख उमेदवारांसह अपक्षांनीही खर्चाच्या बाबतीत ‘जरा जपूनच’ असे धोरण स्वीकारले आहे़ आतापर्र्यंत भाजपाच्या प्रीतम मुंडे यांनी केवळ ७० हजार रुपये खर्च केले़ काँग्रेसच्या अशोक पाटलांनीही हात सैल सोडलेला नाही़ त्यांच्या खिशाला केवळ २७ हजारांची झळ पोहोचली आहे़गोपीनाथराव मुंडे यांच्या मृत्यूने रिक्त झालेल्या जागेसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही़ सात अपक्ष व राजकीय पक्षांचे पाच उमेदवार अशी डझनभर उमेदवारांची ही लढाई आहे़ सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत डॉ़ प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी काँगे्रसचे उमेदवार अशोक पाटील यांना ‘हात’ दाखविण्याची तयारी केली आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीने माघार घेतली तरी कॉंग्रेसने मात्र संधी सोडलेली नाही़ दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील सर्वच्या सर्व १२ उमेदवारांनी ४ आॅक्टोबरपर्यंत केवळ दोन लाख ४० हजार ५४३ रुपये उडवले आहेत़ यात एकट्या प्रीतम मुंडे यांचा खर्च ७१ हजार ७३ रुपये इतका आहे तर काँग्रेसचे अशोक पाटील यांनी केवळ २७ हजार ४५५ रुपये इतका खर्च केला आहे़ पाठोपाठ अपक्ष मुकर्रमजान पठाण यांनी २६ हजार ५१५ रुपये इतका खर्च केला़अपक्ष मनीनाथ तिवारींचे २६ हजार ३३० रुपये खर्च झाले़ अपक्ष तुकाराम उगले यांनी २५ हजार ६४० तर कालीदास आपेट यांचा २५ हजार ५०० रुपये इतका खर्च झाला़ पाठोपाठ तेजस घुमरेंचा २५ हजार २५० रुपये इतका खर्च झाला आहे़ राहुल कांबळेंनी १२ हजार ७८० रुपये खर्च केला आहे़दोन राजकीय पक्षांसह दोन अपक्षांच्या खर्चाचा कुठलाच ताळमेळ नाही़ (प्रतिनिधी)तीन दिवसानंतर एकदा निवडणूक विभागात खर्चातील हिशेब दाखल करणे अनिवार्य आहे़ मात्र, चार उमेदवार असे आहेत, ज्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर खर्चाचा हिशेबच दिला नाही़ त्यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी त्या चारही उमेदवारांना नोटीस पाठवली आहे़ बसपाच्या उमेदवार द्वारका पिराजी कांबळे, रामा वाव्हळे, अपक्ष उमेदवार सुशीला मोराळे, अविनाश वानखडे यांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक खर्च विभागातील अधिकाऱ्यांनी दिली़