शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

ट्रान्सफॉर्मर देण्याचा वेग तिपटीने वाढला

By admin | Updated: November 2, 2014 00:22 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या घटना वाढल्यामुळे शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या घटना वाढल्यामुळे शेतकऱ्यांवर नवे संकट ओढवले आहे. शेतकरी आणि गावकरी डी.पी. मिळविण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात खेट्या मारीत आहेत. याविषयी लोकमतने, हॅलो औरंगाबादमध्ये १ नोव्हेंबरच्या अंकात ‘बंद ट्रान्सफॉर्मरचा शॉक’ या मथळ्याखाली बातमी आणि शॉक हे विशेष पान प्रकाशित केले होते. त्याचा परिणाम शनिवारी महावितरणच्या कारभारावर होताना दिसून आला. वीज ग्राहकांना ट्रान्सफॉर्मर देण्याचा मंदावलेला वेग चक्क तिपटीने वाढला.जिल्ह्यातील औरंगाबाद आणि कन्नड विभागात १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीज ग्राहकांना १४ ट्रान्सफॉर्मर वाटप करण्यात आले. ग्रामीण भागात सध्या शेकडो ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत. त्याचा विपरीत परिणाम पिकांवर होत आहे. महावितरणच्या दोन्ही विभागांमध्ये बंद डीपींचा खच पडला आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा करण्यास महावितरण कमी पडत आहे. विशेष म्हणजे ट्रान्सफॉर्मर जमा केल्यानंतर एक ते दीड महिना मिळत नाही. सिंगल फेज आणि थ्री फेजचे ट्रान्सफॉर्मर मिळण्यासाठी वीज ग्राहकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.महावितरणकडून रोज चार ते पाच ट्रान्सफॉर्मर ग्राहकांना देण्यात येते होते; पण शनिवारी कन्नड विभागातातून ६३ केव्ही- ३ ट्रान्सफॉर्मर, १०० केव्ही- ३, औरंगाबाद विभागातून ६३ के.व्ही.- ५, १०० केव्ही- ३, असे १४ ट्रान्सफॉर्मर वितरित करण्यात आले. ही माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता ए.एन. सोनवणे यांनी दिली.स्पष्टीकरण आणि आवाहनगेल्या काही दिवसांत ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामध्ये डीपी दुरुस्त करणारे विविध कंपन्यांचे कर्मचारी निवडणूक आणि दिवाळीमुळे सुटीवर गेले होते. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होऊ शकत नव्हता. परिणामी, तफावत निर्माण झाली होती. आजपासून सर्व कामकाज पूर्ववत होत आहे. चार-पाच दिवसांत डीपीचा प्रश्न मार्गी लागेल, असे स्पष्टीकरण अधीक्षक अभियंता ए.एन. सोनवणे यांनी दिले.डीपीवर विजेचा अतिरिक्त दाब वाढल्यामुळे ट्रान्सफॉर्मर बंद पडतात. दाब वाढू नये यासाठी ग्राहकांनी आकडे टाकून वीजचोरी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.