हिंगोली : शहराजवळील लिंबाळा एमआयडीसी भागातील २२० के. व्ही. उपकेंद्रात महापारेषणच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी महापारेषणच्या परभणी व नांदेड विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता जे. एस. अंभोरे (परभणी), एस. एस. शेख (नांदेड), चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता बी. डी. चौधरी, महावितरणचे प्रभारी अधीक्षक अभियंता एस. एस. चौधरी (हिंगोली), कार्यकारी अभियंता कांबळे (औरंगाबाद), महापारेषणचे मुख्य अभियंता रोहिदास मस्के, अधीक्षक अभियंता नासेर कादरी (औरंगाबाद) यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये बी. डी. चौधरी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना उपकरणांच्या तांत्रिक संरक्षण प्रणालीची सविस्तर माहिती दिली. तसेच मस्के व कादरी यांनीही मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी महापारेषणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नंदकुमार चारठाणकर, उपकार्यकारी अभियंता देव, वाघमारे, नाईक, बाबु पिटलोड, अब्दुल करीम, दिगंबर लाटे, मोहन कांबळे, सुरेश खांडेकर, रंजित राणे यांच्यासह कनिष्ठ तंत्रज्ञ व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
वीज कर्मचाऱ्यांना विशेष मागदर्शन
By admin | Updated: August 15, 2014 00:04 IST