कुरूंदा : येथे संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त एकदिवसीय समाज प्रबोधन शिबीर घेण्यात आले. जयंतीचे औचित्य साधून गावात मोफत पाणीपुरवठा करणाऱ्या ३५ ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीच्या वतीने आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुरूंदा येथे चर्मकार समाज बांधवांच्या वतीने संत रोहिदास यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मारोती असोले हे होते. तर आ. डॉ. जयप्रकाश मुंदडा, शिवसेना तालुका प्रमुख बालाजी तांभाळे, पं. स. चे गटनेते शिवाजी शिंदे, माजी सभापती रंगराव कदम, सरपंच रेखाताई इंगोेले, मुंजाजीराव इंगोले, माजी सरपंच चंद्रकांत दळवी, राजेश पाटील इंगोले, दत्तराव इंगोेले, बाबुराव शेवाळकर, विश्वनाथराव दळवी, प्रवक्ता ग. मा. पिंजरकर, एस. एन. राऊत, ए. बी. चऱ्हाटे, विजयकुमार मानकर, शोभा भाले, तुळशीराम खंदारे, अनंतराव इंगळे, पं. स. सदस्या कौशल्याबाई मुळे, ग्रा. पं. सदस्या डॉ. प्रीतीताई दळवी, सुवर्णाताई काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गावात नागरिकांना मोफत पाण्याची सुविधा देऊन सहकार्य केल्याबद्दल ३५ ग्रामस्थांचा आ.डॉ. मुंदडा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संत रोहिदास महाराज यांच्या नावे सभागृहासाठी मालकी हक्काचा नमुना नंबर-८ जागेसाठी ग्रामपंचायतीने मान्यवरांच्या उपस्थितीत चर्मकार बांधवांना प्रदान केले. यावेळी आ. मुंदडा यांनी संत रोहिदास यांच्या सभागृहासाठी १० लाख रुपयांचा निधी देण्याचे घोषित केले. एक दिवसीय समाज प्रबोधन शिबीर या निमित्त घेण्यात आले. त्यामध्ये प्रवक्ता ग.मा. पिंजरकर यांचे व्याख्यान झाले. यशस्वीतेसाठी गोविंद आसोले, बी. के. इंगळे, शिवराम आसोले, साहेबराव आसोले, मारोती आसोले, राजू आसोले, भगवान वाघमारे, रावसाहेब वाघमारे, पिराजी विणकरे व चर्मकार समाज बांधवांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास ग्रामस्थ व चर्मकार समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (वार्ताहर)
मोफत पाणी देणाऱ्यांचा विशेष सत्कार
By admin | Updated: March 27, 2016 23:46 IST