शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सभापतींचा पुन्हा थेट ‘सीईओ’वर वार

By admin | Updated: March 27, 2015 00:44 IST

औरंगाबाद : सीईओ हेतूपुरस्सर अन्याय करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आता गंगापूरवासीयांचा सर्वपक्षीय मोर्चा काढावा लागेल, असा इशारा सभापती संतोष जाधव यांनी थेट मंचावरून दिला.

औरंगाबाद : सीईओ हेतूपुरस्सर गंगापूर तालुक्यावर अन्याय करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आता गंगापूरवासीयांचा सर्वपक्षीय मोर्चा काढावा लागेल, असा इशारा जिल्हा परिषदेचे बांधकाम व अर्थ सभापती संतोष जाधव यांनी थेट मंचावरून दिला. चार दिवसांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही त्यांनी सीईओंवर हाच आरोप केला होता. अर्थसंकल्पीय सभेत बोलत असताना संतोष माने यांनी गंगापूरला स्वतंत्र गटविकास अधिकारी नाही व ज्यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे ते गंगापुरात फिरकत नाहीत. त्यामुळे गंगापूर तालुक्यातील सर्व विकासकामे रखडली आहेत, असे सांगितले. माने यांना मध्येच थांबवून सभापती जाधव म्हणाले, हे सीईओ हेतूपुरस्सर हा प्रकार करीत आहेत. गंगापूरला बीडीओ द्यावा म्हणून स्थायी समितीच्या बैठकीत मी खुर्ची सोडून खाली बसलो; परंतु त्यावरही सीईओ बोलत नाहीत, या भूमिकेविरुद्ध आपण सर्व मिळून विभागीय आयुक्त कार्यालयावर एक मोर्चा काढू. जाधव यांच्या वक्तव्यावर सीईओ डॉ. अभिजित चौधरी संतप्त होत म्हणाले, माझ्यावर पर्सनल बोलू नका, मी नियमानुसार काम करतो. स्वतंत्र बीडीओ देणे हे राज्य सरकारचे काम आहे. आहे त्या अधिकाऱ्यातून पर्यायी व्यवस्था करण्याचा आपण प्रयत्न करू. या वादविवादामुळे सभागृह स्तब्ध झाले होते.