शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

‘चिंग्स का तडका’ला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: May 15, 2014 00:32 IST

औरंगाबाद : चायनीज म्हटले की चटकदार जेवण डोळ्यासमोर येते.

औरंगाबाद : चायनीज म्हटले की चटकदार जेवण डोळ्यासमोर येते. चवदार चायनीज पदार्थ कसे तयार करायचे याची माहिती टी.व्ही.वर शेफ हरपालसिंग सोखी देत असतात. रेसिपीजचे प्रशिक्षण देणारे शेफ हरपालसिंग सोखी यांच्यासोबत प्रत्यक्ष चायनीज रेसिपी शिकण्याचा आनंद आज सखींनी लुटला. लोकमत सखी मंच व चिंग्सच्या वतीने ‘चिंग्स का तडका’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम शेकडो सखींच्या उपस्थितीत लोकमत भवनच्या हॉलमध्ये बुधवारी पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन शेफ हरपालसिंग सोखी यांच्या हस्ते झाले. लोकमत इव्हेंट व्यवस्थापक सुहास शहाणे यांच्या हस्ते हरपालसिंग सोखी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी चिंग्सचे असिस्टंट मॅनेजर रिमा शहा, सखी मंचच्या अध्यक्षा रेखा राठी, तसेच कमिटीचे मेंबर मनीषा सोनी, गीता अग्रवाल यांची उपस्थिती होती. यावेळी थ्री पेपर पनीर, आलू कॉर्न पकोडे, क्रिस्पी बेबी कॉर्न, चायनीज पोहे, अशा विविध पदार्थांचा आस्वाद सखींनी घेतला. सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून सोखी यांनीही हसत खेळत छोटे- छोटे विनोद करीत चविष्ट सल्लेही दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीता पानसरे यांनी केले. उपस्थित महिलांनी प्रत्यक्ष शेफ हरपालसिंग सोखी यांच्यासोबत पाककृती करण्याचा अनुभव घेतला. चायनीज पदार्थ तयार करणे किती सोपे आहे, त्यात किती विविधता आणता येऊ शकते याचा अनुभव त्यांनी घेतला. रोजच्या जेवणातही चायनीज तडका कसा आणता येऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक शेफच्या मार्गदर्शनाखाली सखींनी घेतले. कोणत्याही पदार्थाला दिली जाणारी फोडणी आणि त्यात वापरण्यात येणार्‍या पदार्थांचे प्रमाण यावर चविष्टपणा अवलंबून असतो. वेगवेगळ्या प्रकारचे चिंग्स मसाले, चटणी, सॉस, सूप यांच्या वापराने झटपट चवदार पदार्थ बनविण्याचे तंत्र शेफ हरपालसिंग सोखी यांनी शिकविले.