हिमायतनगर : तालुक्यात दोन दिवस भीजपाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली. दोन-तीन बार पेरणी वाया गेली. काही शेतकऱ्यांची दुबार तर काहींची तिबार पेरणीस प्रारंभ केला आहे.पावसाची भुरभुर २१, २२ जुलै पासून सुरू आहे. पेरणीसाठी योग्य पाऊस असून पुढे मोठ्या पावसाच्या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी पेरणीस प्रारंभ केला. पण शेतकऱ्यास पाऊस पुन्हा दगा देणार तर नाही ना? अशी शंका आहे. उधारउसनवारी, इकडूनतिकडून सावकारी आदींच्या माध्यमातून बियाणे खरेदी केले. काही शेतकऱ्यांनी पत्नीच्या अंगावरील दागिने मोडले तर काहींनी जनावरे विकली तर काही औताचे बैल विक्री केले, अशी शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे. आज ४ नंतर भुरभुर पडणारा पाऊस बंद झाला. उद्या पाऊस झाला नाही तर शेतकरी पेरणी बंद करण्याच्या मन:स्थितीत आहेत. (वार्ताहर)स्काऊट गाईडची कार्यशाळा हिमायतनगर : जि. प. हायस्कूलच्या इमारतीत स्काऊट गाईड मिटींग व प्रशिक्षण कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी संगपवार होते. प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक सूर्यवंशी, मुख्याध्यापक मुधोळकर मॅडम, मुख्याध्यापक ए.आर. अनगुलवार मार्गदर्शक स्काऊट गाईडचे करंडे, सूर्यवंशी, डांगे आदी होते. प्रास्ताविक ए. आर. अनगुलवार यांनी केले. स्काऊट गाईडचे सहआयुक्त करंडे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा स्काऊट गाईड घेण्याचे आवाहनही केले. मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनीही मार्गदर्शन केले. आभार डांगे यांनी मानले. या कार्यशाळेला ५० ते ६० स्काऊट गाईड, शिक्षक, क्रीडा शिक्षक हजर होते. (वार्ताहर)
शेतकऱ्यांकडून दुबार, तिबार पेरणी
By admin | Updated: July 24, 2014 00:26 IST