शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

रिमझिम पावसातही पेरणीची सरासरी पार !

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

दिनेश गुळवे , बीड गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील काही भागात झालेला पाऊस व तीन दिवसांपासून काही ठिकाणी पडत असलेला रिमझिम पाऊस यामुळे जिल्ह्यात आता खरीपाच्या पेरणीने सरासरी ओलांडली आहे.

दिनेश गुळवे , बीडगेल्या काही दिवसात जिल्ह्यातील काही भागात झालेला पाऊस व तीन दिवसांपासून काही ठिकाणी पडत असलेला रिमझिम पाऊस यामुळे जिल्ह्यात आता खरीपाच्या पेरणीने सरासरी ओलांडली आहे. धान्य तर पेरले आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात यावर्षी पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी पाऊसाने हुलकावणी दिली आहे. अजुनही जिल्ह्यात केवळ ११० ते १३० मि.मी. पाऊस पडलेला आहे. पावसाची ही सरासरी अत्यंत अल्प आहे. असे असले तरी जो काही पाऊस झाला, त्यावरच शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ ठेवली आहे. जिल्ह्यात खरीप पेरणीचे ५ लाख ६२ हजार ७०० हेक्टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी २४ जुलै पर्यंत जिल्ह्यात तब्बल ७ लाख ६१ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. तर यावर्षी आतापर्यंत ६ लाख २१ हजार ४०० हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे तंत्र अधिकारी पी. बी. बनसावीडे यांनी सांगितले. पेरणीचा हा आकडा सरासरी पेक्षा अधिक असला तरी आवश्यक त्या प्रमाणात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावषी २४ जुलैपर्यंत जवळपास एक लाख हेक्टरवर कापसाचे क्षेत्र कमी आहे. कापसासह सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर आदी पिकांचा पेराही यावर्षी पावसाअभावी कमालीचा घटला आहे. बाजरी, ज्वारी या पिकांचा पेरा घटल्याने धान्य उत्पादन तर घटणारच आहे, शिवाय जनावरांसाठी कडबाही उपलब्ध होणार नसल्याचे मत शेतकरी गंगाधर तळेकर यांनी व्यक्त केले. गेवराई, माजलगाव, शिरूर, वडवणी या परिसरात पावच अगदीच अत्यल्प आहे. जिल्ह्याच्या सरासरीने जरी शंभरी ओलांडली असली तरी काही तालुक्याने अद्याप ५० मि.मी. ही पाऊस झालेला नाही. त्यामुळे त्या-त्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे़पेरा आणखी वाढण्याची शक्यतापीक२०१४२०१३ कापूस३३८९००४१०४००ज्वारी१३१००१९७००बाजरी७४२००९२४००मका६७००१४३००तूर३१४००४०७००मूग७४००१३९००उडीद७५००१५१००सोयाबिन१३२९९९१३३४००भुईमूग१६८१४२००सूर्यफूल३२९८००तीळ१५३८२१००कारळ३४५९००भात३००७००जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी आर. एस. भताने म्हणाले की, आतापर्यंत पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असला, तरी येत्या काही दिवसांमध्ये खरिपाच्या पेरणीचे क्षेत्र आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे. ज्या शेतकऱ्याने पेरा केलेला आहे, त्यांनी पीक विमाही भरावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.१०० मि़मी़ पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करु नयेत, असे आवाहन भताने यांनी केले आहे़