शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: September 5, 2014 00:08 IST

नांदेड : मृग नक्षत्र सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली.

नांदेड : मृग नक्षत्र सुरु होऊन तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु उशिरा झालेल्या पावासामुळे जिल्ह्यातील काही भागातील पेरण्या होऊ शकल्या नसल्याने जवळपास ४० हजार एकर क्षेत्र पेरणीअभावी शिल्लक राहिले आहे. यापूर्वी अधून-मधून बरसणाऱ्या पावसावरच बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, मात्र पावसाने दडी मारल्याने त्यांच्यावर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढावले. तर काही शेतकऱ्यांनी धाडस करुन पेरण्या केल्या. जिल्ह्यात २८ आॅगस्टपर्यंत ९३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून आजघडीला खरीपातील ७ टक्के क्षेत्र पेरणीअभावी पडीक राहिले आहे.जिल्ह्यात ७ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्र खरीपासाठी प्रास्तावित आहे. यापैकी २८ आॅगस्टपर्यंत ७ लाख ३८ हजार हेक्टरवर पेरा झाला असून अद्यापही ४० हजार एकरवर पावसाअभावी पेरण्या झाल्याच नाहीत. आता पाऊस पडला असला तरी पेरणीचा हंगाम संपल्यामुळे पेरणी करुनही पीक हातात पडेल की, नाही याची शाश्वती नाही, यामुळे उर्वरित असलेल्या क्षेत्रावर पेरणी होणे शक्य नाही. पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २ लाख ७२ हजार ४०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून क्षेत्राच्या १०८ टक्के प्रमाण आहे. तर २ लाख ६०७०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या १५१ टक्के प्रमाण आहे. तूर ५४ हजार ६०० हेक्टर, उडिद २० हजार ७०० हेक्टर, मूग १९ हजार ८०० हेक्टर, ज्वारी ५७ हजार ३०० हेक्टर व इतर पिकांच्या अशा एकूण ९३ टक्के पेरण्या झाल्या आहेत.यातील जवळपास ५० टक्के शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केलेली आहे.गतवर्षी सप्टेबर महिन्यात पीके मोठी होऊन डोलू लागली होती. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागल्याने दुबार-तिबार पेरणी करुनही पिके समाधानकारक नाहीत. तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र असे- नांदेड २७२०० हेक्टर, अर्धापूर २१३००, मुदखेड १८ हजार, लोहा ६६८००, कंधार ५०२००, देगलूर ४८८००, मुखेड ७६५००, नायगांव ४१४००, बिलोली ४३ हजार हेक्टर, धर्माबाद २३३००, किनवट ७३७००, माहूर ३२६००, हदगांव ७५१००, हिमायतनगर २७८००, भोकर ४६९०० हेक्टरवर तर उमरी तालुक्यात ३०५०० हेक्टरवर पेरणी झालेली आहे.यापुढे पाऊस पडला तरी पेरणी केलेले पीक येण्याचा हंगाम संपल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलीतरी उत्पादन चागंले येण्याची शाश्वती नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगल उभा राहिला आहे.(प्रतिनिधी)पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २ लाख ७२ हजार ४०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली असून क्षेत्राच्या १०८ टक्के प्रमाण आहे. तर २ लाख ६०७०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे.