शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील नगरपालिकांचे स्रोत आटले

By admin | Updated: May 21, 2016 00:14 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील ग्रामीण भागात ज्याप्रमाणे पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तशीच परिस्थिती शहरी भागातही निर्माण झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ग्रामीण भागात ज्याप्रमाणे पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. तशीच परिस्थिती शहरी भागातही निर्माण झाली आहे. विभागातील नगरपालिका क्षेत्रातील जलस्रोत आटले असून, टँकरद्वारेच नगरपालिकांना नागरिकांना पाणीपुरवठा करावा लागतो आहे. टँकरसाठी अतिरिक्त निधी उभा करणे हे नगरपालिकांना जड जात आहे. नगरपालिकांच्या पाण्याचे स्रोत आटल्यामुळे नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. प्रशासनाकडून टँकरची व्यवस्था होत असली तरी पाणी आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. ४० कि़ मी. लांब किंवा त्याहून अधिक दूरवरून टँकर भरण्यात येत आहेत. त्यामुळे टँकरचा खर्च वाढू लागला आहे. जूनअखेरपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर नगरपालिका परिसरात पाण्याची परिस्थिती भीषण होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. नगरपालिकांचे पाणीपुरवठा करण्याचे पाण्याचे स्रोत आटत चालल्याने पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होत आहे. उदगीर नगरपालिकेला ४० दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लोहा, मुखेड, भोकर, माहूर, अंबाजोगाई, परळी, माजलगाव, गेवराई, औसा, चाकूर, जळकोट, शिरूर अनंतपाळ, देवणी, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, कळंब या नगरपालिकांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. जवळपास सर्वच नगरपालिकांचे स्रोत आटले आहेत. तर काही पालिकांच्या जलस्रोतात आठ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. धारूर, केज, निलंगा, अहमदपूर, चाकूर, जळकोट, कळंब व परंडा नगरपालिकांमध्ये १५ ते २० दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कन्नड, पूर्णा, मानवत नगरपालिकांना ८ दिवसांआड तर वैजापूर, गंगापूर, देगलूर, लोहा, भोकर, माहूर, गेवराई, कंधार या नगरपालिकांना चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मराठवाड्यातील ५३ नगरपालिकांच्या पाणीटंचाईचा आराखडा नगरपालिका प्रशासनाने केला होता. मात्र, पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे पाणीपुरवठा करायचा कसा, याचे प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.