शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अॅक्सीलेटरच्या आवाजाने वाचला जीव, बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार थोडक्यात बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 13:42 IST

पांचाळ पडताना ॲक्सीलेटर अचानक वाढले व दुचाकी रेस होऊन आवाज झाला. त्यामुळे बिबट्या घाबरून पाटोद्याच्या दिशेने वळला.

वाळूज महानगर : पांदीरस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारावर उसाच्या फडातून आलेल्या बिबट्याने झेप घेतली. मात्र वेगातील दुचाकी व स्वार खाली पडतांना घाईगडबडीत दुचाकीचे ॲक्सीलेटर वाढून मोठा आवाजा झाल्याने बिबट्याने धूम ठोकल्याची थरारक घटना गुरुवारी (दि.१६) दुपारी १२ वाजेच्या सुमारास पाटोदा-नायगाव रस्त्यावर घडली.

नशीब बलवत्तर असल्याने दुचाकीस्वार जनार्धन तुकाराम पांचाळ (४९ ,रा. बकवालनगर) यांचा थोडक्यात जीव वाचला. पांचाळ यांची सांगितल्यानुसार, त्यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. मजुरांना वाल्मीत कामावर सोडून ड्रील मशीन आणण्यासाठी ते एकटेच दुचाकीने पाटोदा-नायगाव मार्गे बकवालनगरकडे चालले होते. या निर्जन पांदीतून जातांना उसाच्या फडातून अचानक बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली. मात्र दुचाकी वेगात असल्याने बिबट्याचा नेम चुकला तर नियंत्रण सुटल्याने पांचाळ दुचाकीवरुन खाली पडले. त्यामुळे पांचाळ यांची भीतीने गाळण उडाली.

अन् बिबट्याने धूम ठोकलीपांचाळ पडताना ॲक्सीलेटर अचानक वाढले व दुचाकी रेस होऊन आवाज झाला. त्यामुळे बिबट्या घाबरून पाटोद्याच्या दिशेने वळला. दुचाकी जागेवरच सोडून पांचाळ जीवाच्या आकांताने नायगावच्या दिशेने पळत सुटले. जवळपास अर्धा किलोमीटर पळाल्यानंतर दम लागल्याने ते थांबले. या घटनेची माहिती मित्र ज्ञानेश्वर वनारसे यांना दिली. त्यानंतर ग्रामस्थांना कळविले.

वनविभागाकडून घटनास्थळाची पाहणीनायगाव व बकवालनगरातील सलीम शेख, शंकर राठोड, रावसाहेब भुजंग, राम जाधव, राजु मिठे आदींनी जनार्धन पांचाळ यांना सोबत घेऊन वाळूज पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वन विभागशी संपर्क साधल्यानंतर सायंयकाळी वनपाल सतीश काळे, वनरक्षक आर. एच. मुळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पांचाळ यांच्याकडून माहिती घेतली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादleopardबिबट्या