शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच दररोज पाणी

By admin | Updated: February 18, 2016 00:08 IST

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे आदेश मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत.

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिकांना दररोज पाणी मिळाले पाहिजे, असे आदेश मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. जायकवाडी धरणातून एक थेंबही अतिरिक्त पाणी न घेता दररोज पाणी कसे देता येईल, याचे नियोजन करणे सुरू केले आहे. शहरातील अंतर्गत लिकेजेस बंद करून नागरिकांना पाणी देण्यात येणार असल्याचे केंद्रेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना नमूद केले.मागील काही वर्षांपासून मनपा शहराला दोन दिवसांआड पाणी देत आहे. प्रत्यक्षात नागरिकांना आठवड्यातून दोनदाच पाणी मिळते. शहराबाहेर अनेक वसाहतींना मनपा पाणी देण्यास असमर्थता दर्शवीत आहे. नवीन वसाहतींना किमान टँकरने तरी पाणी मिळावे, अशी रास्त अपेक्षा नागरिकांची आहे. त्यातच सातारा-देवळाई परिसर मनपाच्या ताब्यात आल्याने या भागातील ४०-४५ हजार नागरिकांना पाणी देण्याचे दायित्व मनपावर येऊन पडले आहे. जायकवाडी धरणात सध्या ३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यातील सुमारे ४० टीएमसी पाणी मनपाला पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. उपयुक्त साठा संपल्यावर मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करावा लागणार आहे. २०१२ मध्ये जशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. यंदा तशीच परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्कालीनचे सहा पंप तयार ठेवण्याचे आदेश केंद्रेकर यांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसह मनपा अधिकाऱ्यांना दिले आहेत.शहरातील ११३ वॉर्डांमध्ये लिकेज खूप आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. लिकेजेस बंद करून दररोज पाणी नागरिकांना कसे देता येईल, यावर अधिक भर देण्यात आला आहे. मनपा पाण्याचा अपव्यय टाळून ते नागरिकांना देण्याचा प्रयत्न करीत आहे. नागरिकांना दररोज पाणी मिळाले पाहिजे. कारण त्यांचा तो हक्कआहे, असेही केंद्रेकर यांनी नमूद केले. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यावरून वाद निर्माण होतात. यंदा उन्हाळ्यात पाणीपुरवठा जास्तीत जास्त सुरळीत कसा राहील, यावरही मनपा अधिक भर देणार आहे.