शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

मालोजीराजे भोसले गढीचे चित्र पालटणार; ५ कोटींचा आराखडा तयार करण्याचे सांस्कृतिक मंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:09 IST

Maloji Raje Bhosle Gadhi, Verul वेरुळ येथील शहाजी राजे भोसले स्मारकावर सास्कृतिक मंञी अमित देशमुख यांनी आज भेट देवून स्मारक परिसराची पाहणी केली.

ठळक मुद्देशहाजीराजे भोसले यांच्या नावाने संशोधन केंद्रजिल्हा सांस्कृतिक केंद्र उभारणे

खुलताबाद : वेरुळ येथील मालोजीराजे भोसले यांच्या मालकीच्या गढीचे संवर्धन व जतन करण्यासाठी शासनाने हाती घेतले आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा नव्याने आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जगप्रसिध्द वेरुळ लेण्यांमध्ये इलेक्ट्रिक बसेसची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक व वैद्यकिय शिक्षण मंञी अमित देशमुख यांनी मंगळवारी (दिं.16) वेरुळ येथे पञकार परिषदेत दिली.

तालुक्यातील वेरुळ येथील शहाजी राजे भोसले स्मारकावर सास्कृतिक मंञी अमित देशमुख यांनी आज भेट देवून स्मारक परिसराची पाहणी केली.  अभ्यासक व पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांकडून गढीची सविस्तर माहिती जाणुन घेतली. त्यानंतर मंत्री देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील गड, किल्ले, प्राचीन स्थळे यांच्या विकासाबाबत महाविकास आघाडी सरकार संवेदनशील असून मालोजीराजे भोसले गढी ही ऐतिहासिक वारसा आहे. याचे जतन करण्याबरोबरच संवर्धन व विकास करण्यात येईल. यासाठी ५ कोटींचा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच शहाजीराजे भोसले यांच्या नावाने संशोधन केंद्र सुरु करण्याचे विचाराधीन असल्याचे ही त्यांनी सांगितले. 

यावेळी पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे , माजी आमदार डॉ.कल्याण काळे, जि.प.अध्यक्षा मीनाताई शेळके, जि.म.सह.बॅंकेचे संचालक किरण पाटील डोंणगांवकर, विलास औताडे, तालुकाध्यक्ष अनिल श्रीखंडे , माजी सभापती महेश उबाळे , मजहर पटेल, किशोर चव्हाण , मनोज पाटील,  जगन्नाथ खोसरे,  सरपंच कुसूम प्रकाश मिसाळ , उपसरपंच विजय राठोड, गणपत म्हस्के, आबेद जहागीरदार, संजय मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचीन मंदिरांचा होणार जीर्णोधार आणि पुर्नविकास शासनाने महाराष्ट्रातील प्राचीन मंदीरांचा जीर्णोधार आणि पुर्नविकास करण्याचे ठरविले आहे. त्यात मराठवाड्यातील औरंगाबाद येथील सातारा परिसरीतील खंडोबा मंदीर, तुळजापूर, कंकाळेश्वर, औंढा नागनाथ , माहुर येथील रेणूका मंदीर, नरसिंग मंदीर व इतर मंदीराचा पहिल्या टप्प्यात समावेश असल्याची माहिती मंत्री देशमुख यांनी दिली. यासोबतच वेरूळ लेण्यांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महोत्सव, जिल्हा सांस्कृतिक केंद्र उभारणे, शहाजीराजे भोसले यांच्या नावाने संशोधन केंद्र, दौलताबाद किल्ला परिसरात आधुनिक सोयी सुविधा देणे, वेरूळ येथील लेणी परिसरातील पर्यटक अभ्यागत केंद्राची सेवा पुरवत करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Amit Deshmukhअमित देशमुखAjantha - Elloraअजंठा वेरूळfundsनिधीcultureसांस्कृतिक