शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री जाताच मनपा सभेत १२५ कोटींच्या निधीवर जोरदार खल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:11 IST

शहरातील जास्तीत जास्त रस्ते गुळगुळीत व्हावेत या उदात्त हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जानेवारी रोजी शहराला आणखी १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. आजपर्यंत महापालिकेतील कारभाऱ्यांनी यादीच तयार केली नाही. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात होते. ते रवाना होताच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास १२५ कोटींच्या निधीत कोणते रस्ते घ्यावेत, यावर जोरदार खल झाला. शेवटी आठ दिवसांनंतर सर्व पदाधिकारी बसून यादी निश्चित करतील, असा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देदोन तास चर्चा : रस्त्यांची यादी आठ दिवसांनंतर ठरविणार

औरंगाबाद : शहरातील जास्तीत जास्त रस्ते गुळगुळीत व्हावेत या उदात्त हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ जानेवारी रोजी शहराला आणखी १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. आजपर्यंत महापालिकेतील कारभाऱ्यांनी यादीच तयार केली नाही. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात होते. ते रवाना होताच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल दोन तास १२५ कोटींच्या निधीत कोणते रस्ते घ्यावेत, यावर जोरदार खल झाला. शेवटी आठ दिवसांनंतर सर्व पदाधिकारी बसून यादी निश्चित करतील, असा निर्णय घेण्यात आला.शहरातील प्रमुख रस्ते सिमेंट पद्धतीने गुळगुळीत करावेत. ज्या रस्त्यांवर नागरिकांचा जास्त वावर आहे, पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते, अशा रस्त्यांची निवड करावी, असे मुख्यमंत्र्यांनी खाजगीत महापालिका पदाधिकाºयांना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी निधीची घोषणा केल्यानंतर किमान आठ दिवसांत तरी मनपाचा प्रस्ताव शासनाकडे जाणे अपेक्षित होते. १२५ कोटींच्या निधीत रस्ते कोणते घ्यावेत यावरून सध्या महापालिकेतील राजकारण तापले आहे. बुधवारी दुपारी ३.३० वाजता सर्वसाधारण सभा सुरू होताच भाजप नगरसेवकांनी १२५ कोटींचा निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव ठेवला. त्यानंतर सेना, एमआयएम, भाजप, अपक्ष नगरसेवक आपापल्या वॉर्डातील डी.पी. रस्त्यांचा यात समावेश करावा, असा आग्रह धरू लागले. राजू शिंदे यांनी सातारा-देवळाईसाठी २५ कोटींचे रस्ते करण्यात येणार होते, ते आजपर्यंत झालेले नाहीत, १२५ कोटींची कामे घेणाºया कंत्राटदारांकडून सातारा-देवळाईची कामे करून घ्यावीत, अशी मागणी केली. उपमहापौर विजय औताडे यांनी फक्त आणि फक्त डी.पी. रस्त्यांचा समावेश करावा, असे नमूद केले.डिफर पेमेंटच्या रस्त्यांचा समावेश करावा१०० कोटींच्या कामांसोबत महापालिकेने आपल्या निधीतून ५० कोटींचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला होता. डिफर पेमेंट पद्धतीवर ही कामे ६८ कोटींपर्यंत जात आहेत. महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता डिफर पेमेंटमधील रस्ते १२५ कोटींत घ्यावेत, असा आग्रह बहुतांश नगरसेवकांनी धरला. रस्त्यांची यादी अंतिम करण्याचे अधिकार महापौर-उपमहापौरांना द्यावेत, असे सभागृहनेता विकास जैन यांनी सांगितले. शेवटी महापौर नंदकुमार घोडेले यांनी जाहीर केले की, सर्वपक्षीय पदाधिकारी बसून यादी अंतिम करतील. आठ दिवसांनंतर यादी शासनाकडे सादर करण्यात येईल.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस