शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चिल्लर घेईना कुणी,बँकेत करोडोंच्या नाण्यांचा ढीग;अफवा,डिजिटल पेमेंटने बँकांसमोर यक्षप्रश्न

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 12, 2022 17:23 IST

औरंगाबादमधील चित्र : नाणी बंद झाल्याची अफवा अन् डिजिटल पेमेंटचा परिणाम

औरंगाबाद : एकीकडे बँकाना रिझर्व्ह बँकेकडून नाण्यांचा पुरवठा केला जात असून, दुसरीकडे बाजारात १० रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा, खिशात नाणी बाळगणे जड वाटते आणि छोट्या व्यवहारातही डिजिटल पेमेंटचा (यूपीआय) वाढता वापर यांमुळे बाजारात चिल्लर नाण्यांचा व्यवहार कमी होत आहे. परिणामी, औरंगाबादेतील बँकांच्या करन्सी चेस्टमध्ये तब्बल ९ कोटी रुपये मूल्यांची नाणी साठली आहे. बँकांमध्ये आता नाण्यांचा हा साठा ठेवण्यासाठी जागाच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

औरंगाबाद शहरात १० रुपयांची नाणी व्यवहारात आहेत, पण जिल्ह्यात ग्रामीण भागात ही नाणी व्यवहारात दिसत नाही. तालुक्यातील बँकांच्या शाखांतून शहरातील करन्सी चेस्टमध्ये नाणी पाठविली जात आहेत. एवढेच नव्हे, तर परभणी, बीड, नांदेड या शहरांतून औरंगाबादेत येणारे नागरिक सोबत नाणी घेऊन येत आहेत. तेथे १० रुपयांची नाणी व्यापारी घेत नाहीत. त्यामुळे तेथील नागरिक औरंगाबादेत येऊन नाण्यांचा वापर करीत आहेत.स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन करन्सी चेस्ट आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व एचडीएफसी या बँकांच्या करन्सी चेस्ट आहेत. या बँकांच्या मिळून ९ कोटींची नाणी धूळखात पडून आहे. ग्राहक नाणी घेण्यास तयार नाहीत. त्यात ६० टक्के नाणी ही १० रुपयांची आहेत. काही किरकोळ विक्रेतेच नाणी घेतात. या ९ कोटींच्या नाण्यांचे करायचे काय, असा यक्षप्रश्न बँकांसमोर आहे. कारण, रिझर्व्ह बँक नाणी परत घेण्यास तयार नाही. नाणी व्यवहारातच चालवा, असे आदेश आहेत.

२० रुपयांच्या नाण्यांची भरआधची १ रुपया, २ रुपये, ५ रुपये व १० रुपयांची नाणी बँकांमध्ये धूळखात पडून असताना रिझर्व्ह बँकेने २० रुपयांच्या नाणी मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये पाठविली आहेत.

दैनंदिन व्यवहारात नाण्यांचा वापर वाढवारिझर्व्ह बँकेने वेळोवेळी जाहीर केले आहे की, कोणतेही नाणी व्यवहारातून बाद केली नाहीत. बँकांना नाणी आणून देण्यापेक्षा ती दैनंदिन व्यवहारात उपयोगात आणा. ज्यांना नाणी लागतात त्यांनी बँकांमध्ये मागणी करावी.- शिवानी वर्मा, मुख्य व्यवस्थापक, एसबीआय, क्रांतिचौक करन्सी चेस्ट

१० रुपयांच्या नोटांचा तुटवडासेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या करन्सी चेस्टमध्ये ५० लाखांची नाणी पडून आहेत. त्यात ३५ लाखांच्या १० रुपयांनी नाण्यांचा समावेश आहे. ग्राहक १० रुपयांनी नाणी घेत नाही, दुसरीकडे १० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे. नाणी घेऊन जा, असा आग्रह आम्ही ग्राहकांना करतो.- हेमंत जामखेडकर, महासचिव, सीबीआयईए

टॅग्स :bankबँकMarketबाजारAurangabadऔरंगाबाद