अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन जज्बा या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करीत आहे. या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग यापूर्वी 2015 मध्ये सुरू करण्याचे ठरवण्यात आले होते; पण आता चित्रपटाचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी शूटिंग लवकर सुरू करायचे ठरवले आहे. या चित्रपटात जॉन अब्राहमचीही मुख्य भूमिका आहे. जॉनला मुंबई सागा आणि वेलकम बॅक या चित्रपटांसाठीही वेळ द्यावा लागणार आहे. यापूर्वी तो मुंबई सागाचे शूटिंग संपवून जज्बाचे शूटिंग करणार आहे. सध्या ऐश्वर्याकडे वेळच वेळ आहे. त्यामुळे तिच्या वाटय़ाचे शूटिंग लवकर सुरू करण्याचा विचार संजय गुप्तांच्या मनात आला. ऐशही त्यासाठी तयार झाली. जज्बामध्ये ऐश्वर्याचे अॅक्शन सीन्स असणार आहेत. या चित्रपटात तिच्यासोबत इरफान खान आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसतील.
सामाजिक उपक्रम राबवून नवरात्रौत्सव
By admin | Updated: September 27, 2014 23:43 IST