शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत शिष्यवृत्तीचे २० टक्केच अर्ज प्राप्त; महाविद्यालयांच्या दिरंगाईची आयुक्तांकडून दखल

By विजय सरवदे | Updated: January 27, 2024 14:53 IST

मागील शैक्षणिक वर्षात अनुसूचित जातीच्या २९ हजार ४५४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला होता.

छत्रपती संभाजीनगर : समाज कल्याण विभागाच्या लॉगीनवर आतापर्यंत अवघे २० टक्के म्हणजे ५ हजार ७९२ एवढेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. यासंदर्भात महाविद्यालयांना वेळप्रसंगी नोटिसा द्या. सतत पाठपुरावा करा आणि त्यांच्या लॉगीनवर प्रलंबित अर्ज तत्काळ फॉरवर्ड करण्याच्या सूचना द्या. ज्यामुळे एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, असे निर्देश समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सहायक आयुक्तांना दिले.

चालू शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आता सात-आठ महिन्यांचा कालावधी होत आहे. ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ११ ऑक्टोबरपासून महाडीबीटी पोर्टल सुरू झाले. तीन महिन्यांनंतरही अद्याप शिष्यवृत्ती योजनेने गती घेतलेली नाही. केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे, तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांची सारखी परिस्थिती आहे. यासंदर्भात मंगळवारी (२३ जानेवारी) आयुक्त बकोरिया यांनी सर्व जिल्ह्यांच्या सहायक आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे बैठक घेऊन शिष्यवृत्तीपासून एकही मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहणार नाही, यासाठी महाविद्यालयांकडे सतत पाठपुरावा करून अर्ज मागवून घेण्याचे निर्देश दिले.

तथापि, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी १८ जानेवारी रोजीच सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून आपल्या लॉगीनवर पडून असलेल्या शिष्यवृत्ती अर्जांची छाननी करून परिपूर्ण अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगीनवर फॉरवर्ड करावेत. याशिवाय लॉगीनवर अर्ज प्रलंबित असल्याबद्दल खुलासाही सादर करावा, असे सूचित केले होते. त्यानंतर या दोन-तीन दिवसांत महाविद्यालयांकडून एक-दीड हजार अर्ज समाज कल्याणच्या लॉगीनवर प्राप्त झाले आहेत.

१० हजार ५३१ अर्ज छाननीविना पडूनमागील शैक्षणिक वर्षात अनुसूचित जातीच्या २९ हजार ४५४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला होता. या तुलनेत आतापर्यंत १६ हजार ३२३ विद्यार्थ्यांनीच महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले आहेत. त्यापैकी महाविद्यालयांनी तपासणी करून ५ हजार ७९२ परिपूर्ण अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगीनवर पाठविले आहेत. महाविद्यालयांच्या लॉगीनवर अद्यापही १० हजार ५३१ अर्ज पडून आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्ती