शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
4
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
5
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
6
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
7
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
8
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
9
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
10
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
11
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
12
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
13
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
14
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
15
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
16
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
17
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
18
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
19
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
20
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!

औषधी कंपनीच्या टाकाऊ मालातून नशेसाठी रासायनिक पावडरची कोट्यवधींत तस्करी

By सुमित डोळे | Updated: June 23, 2025 20:14 IST

केमिकल रसायनाची तलाव, नाल्यांत केली जाते विल्हेवाट; अनेक महिन्यांपासून रॅकेट, विल्हेवाट लावणे बंधनकारक, पण बेकायदेशीररीत्या पुनर्वापर

छत्रपती संभाजीनगर : वाळुज औद्योगिक वसाहतीमधील औषधी कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या हॅझर्डस वेस्टच्या माध्यमातून रासायनिक पावडरची तस्करी होते. बाजारभावानुसार लाखो रुपयांची असलेली ही पावडर नशेखोरांच्या तस्करांना कोट्यवधी रुपयांना विकून त्याचा नशेसाठी वापर केला जात असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अनेक महिन्यांपासून सुरू असलेला हा प्रकार एनडीपीएस पथकाच्या कारवाईनंतर शनिवारी समोर आला.

एनडीपीएस पथकाच्या निरीक्षक गीता बागवडे, एमआयडीसी वाळुजचे सहायक निरीक्षक मनोज शिंदे यांनी एका औषधी कंपनीतून हॅझर्डस वेस्ट (घातक कच्चा माल, कचरा) घेऊन जाणारे दोन ट्रक पकडले. शासन नियुक्त कंपनीऐवजी हे ट्रक साजापूरच्या बबन खानच्या गोडाऊनमध्ये जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकच्या बाल्टीवर (गेट पास) बॅरेल, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्यांचा उल्लेख होता. मात्र, ट्रकमध्ये मिळून आलेल्या दीड किलो पावडरचा उल्लेख नव्हता. गंभीर आजारांवरील औषध तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या पावडरची बाहेर विक्री, पुरवठ्यावर निर्बंध आहेत.

काय आहे नियम?कंपन्यांमधून निघणारे घातक रसायन, साहित्यावर कंपनीतच उभारण्यात आलेल्या एटीपी म्हणजेच प्राथमिक सांडपाणी प्रक्रिया प्लँटमध्ये प्रक्रिया केली जाते. परिणामी, त्याची दाहकता, घातकपणा कमी होतो. त्यानंतर मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात पाठवणे गरजेचे असते. तेथे पुन्हा प्रक्रिया करून शासनाने निर्धारित केलेल्या ठिकाणी सोडले जाते. तोपर्यंत ते सौम्य झाल्याने त्याचे दुष्परिणाम नसतात. तर अति घातक साहित्य पुणे व नागपूरमधील शासननियुक्त कंपनीला पाठविणे बंधनकारक आहे. येथे नियमानुसार धोकादायक कचऱ्यावर प्रक्रिया करून नष्ट केला जातो.

नियमाला फाटा का?औषधी कंपन्यांकडून घातक रसायन, साहित्य नष्ट करण्याचा वैध खर्च वाचविण्यासाठी स्थानिक भंगार व्यावसायिकांनाच कोट्यवधींचे कंत्राट देऊन विल्हेवाट लावतात. यात मोठा राजकीय हस्तक्षेप आहे. केवळ वाळुजमध्ये या रॅकेटची महिन्याकाठी जवळपास ५० ते ७० कोटी रुपयांची उलाढाल होते. यात विशेष वाहन वापरासाठी कंपन्यांकडून प्रति किलोमीटर, प्रति टँकरसह टोलचेही पैसे दिले जातात. मात्र, हा सर्व खर्च वाचविण्यासाठी हॅझर्डस वेस्टची स्थानिक पातळीवरच अवैधरीत्या विल्हेवाट लावली जाते. डिसेंबर महिन्यात असे दाेन ट्रक पकडून साहित्याची पोलिसांनी परस्पर विल्हेवाट लावली होती.

पावडरचा नशेसाठी वापरतीन वर्षांपूर्वी औषधी कंपनीचा कर्मचारी अशाच पावडरची नशेसाठी विक्री करताना सापडला होता. कंपनीतून काढल्यानंतर त्याने बाहेर पडताना जवळपास ४ ते ५ किलो पावडर चोरली होती. त्याच पद्धतीने अजूनही औषधी कंपन्यांमधून पावडरची छुप्या पद्धतीने तस्करी सुरू आहे. ज्याची अमली पदार्थांच्या तस्करांना विक्री करून नशेसाठी वापर होतो. लाखो रुपयांचा बाजारभाव असलेली पावडर नशेखाेरांच्या दुनियेत कोट्यवधी रुपयांना विकली जाते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरDrugsअमली पदार्थ