शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:10 IST

सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून एकाच रात्री मुख्य रस्त्यावरील सहा दुकाने फोडल्याने व्यापारी व गावक-यांत घबराट निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्याने या चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शनिवारी रात्रीही चिंचोली लिंबाजी व पैठण येथे चोरट्यांनी सलामी दिली होती. दुसºया दिवशी पुन्हा बनोटीत अशीच घटना घडल्याने ग्रामस्थांनी पोलिसांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबनोटी : सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालून एकाच रात्री मुख्य रस्त्यावरील सहा दुकाने फोडल्याने व्यापारी व गावक-यांत घबराट निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्याने या चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शनिवारी रात्रीही चिंचोली लिंबाजी व पैठण येथे चोरट्यांनी सलामी दिली होती. दुसºया दिवशी पुन्हा बनोटीत अशीच घटना घडल्याने ग्रामस्थांनी पोलिसांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.बनोटीतील चोरीच्या घटनेत २० हजार दोनशे रुपये रोख रक्कमेसह मुद्देमाल, एक मोटारसायकल चोरट्यांनी लंपास केली. मकर संक्रांतीच्या मध्यरात्री बनोटी गावातील मुख्य रस्त्यावरील गावाच्या मध्यभागी असलेल्या बिअर बारचा कडीकोंडा तोडून दहा बिअरच्या बाटल्या चोरी गेल्या. तर जिल्हा परिषद शाळेबाहेरील समाधान पाटील यांचे किराणा व जनरल दुकान, विनोद सुरळे यांच्या प्रोव्हीजनचे शटर उचकटून रोख रकमेसह किराणा माल चोरट्यांनी लंपास केला. यानंतर संभाजी चौकातील समर्थ आॅटो स्पेअरपार्ट अ‍ॅण्ड टायर दुकानाचे शटर तोडून चौदा हजार तीनशे रुपये रोख लंपास करुन मालाची नासधूस केली. तसेच वनरक्षक गणेश दांगोडे यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची मोटारसायकलही (एम. एच -२१-एएफ -७०१२) चोरट्यांनी लांबविली. एकाच रात्री सहा दुकानांचे शटर तोडून धाडसी चोरीची घटना प्रथमच घडल्याने व्यापारी वर्गात व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेच ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक सुजीत बडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी.ए. जागडे, पो.कॉ. योगेश झाल्टे, सतीश पाटील, दीपक पाटील तपास करीत आहेत.महिनाभरापासून चोºयांची मालिकागेल्या महिनाभरात जिल्ह्यातील आडूळ जैन मंदिरासह लासूर स्टेशन, पैठण, चिंचोली लिंबाजी, टेंभापुरी, जातेगाव, बाबरा आदी ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घालून लाखो रुपयांचा ऐवज चोरुन नेला. यापैकी एकाही चोरीचा तपास अद्याप लागलेला नसताना चोºयांची मालिका सुरुच असल्याचे दिसत आहे.पैठण शहरात आठवडाभरात तीन चोºया झाल्याने भयभीत झालेले व्यापारी रविवारी पोलिस ठाण्यात गेले असता तेथील अधिकाºयांनी दिलासा न देता अरेरावी केल्याने शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांप्रती नाराजी वाढली आहे. याशिवाय जिल्ह्यात भुरट्या चोºयाही वाढल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत.